- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Industrialist-ratan-tata-mumbai :उद्योगपती रतन टाटा काळाच्या पडद्याआड; वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
photo: social media
भारतीय अलंकार न्यूज 24
मुंबई: उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनकच होती. अखेर त्यांनी बुधवारी 9 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा अखेरचा श्वास घेतला.
दोन दिवसांपूर्वीच रतन टाटा (Ratan Tata) यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत झाला होता. रतन टाटा यांच्या वडिलांचे नाव नवल टाटा आणि आईचे नाव सुनी टाटा होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले होते. शिमल्याच्या बिशप कॉटन स्कूलमध्ये शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी परदेशात शिक्षण घेतले होते.
दोन दिवसां पूर्वी चाहत्यांशी शेवटचा संवाद
माझा विचार केल्याबद्दल धन्यवाद...
माझ्या आरोग्याबाबत पसरत असलेल्या अलीकडील अफवांची मला जाणीव आहे आणि हे दावे निराधार आहेत याची सर्वांना खात्री देऊ इच्छितो. माझे वय आणि संबंधित वैद्यकीय परिस्थितीमुळे मी सध्या वैद्यकीय तपासणी करत आहे.
चिंतेचे कारण नाही. मी चांगल्या आत्म्यात राहतो आणि विनंती करतो की सार्वजनिक आणि माध्यमांनी चुकीची माहिती पसरवण्यापासून दूर राहावे.
विनम्र,
रतन टाटा
असे आपल्या X social media handel वरून रतन टाटा व्यक्त झाले होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा