- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : भाजपाने आपली 99 उमेदवारांची यादी काल जाहीर केली. या यादीत अनेक विद्यमान आमदारांना आपल्या नावाची अपेक्षा होती, मात्र तसं झालं नाही. अकोला जिल्ह्यातील चार विद्यमान आमदारांपैकी केवळ अकोला पूर्व विधानसभा मतदार संघातून रणधीर सावरकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. अकोला पश्चिमचे आमदार स्व.गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त आहे. रणधीर सावरकर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली असली तरी उर्वरित दोन आमदारांचे भवितव्य काय हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
मुर्तीजापुर आणि अकोट या दोन विधानसभा क्षेत्रातील विद्यमान भाजप आमदारांना पहिल्या यादीत स्थान मिळालेले नाही. त्यामुळे अकोटचे भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे आणि मुर्तीजापुरचे भाजपचे आमदार हरिष पिंपळे यांना वेटिंग वर का ठेवण्यात आलं ? तर यांचा पत्ता तर कट होणार नाही ना याबाबत आता जोरदार चर्चां रंगत आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा