political-news-bjp-shiv-sena: सुषमा अंधारे यांच्या आरोपाला पोलिसांनी तर संजय राऊत यांच्या प्रश्नाचं उत्तर हॉटेल मालकाने दिलं - चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : नागपूर हिट अँड रन प्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज अकोल्यात वक्तव्य करण टाळलं आहे. शिवसेना ठाकरे गटा तर्फे हिट अँड रन प्रकरणी बावनकुळेंवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिवसेना नेत्या (उबाठा) सुषमा अंधारे यांनी बावनकुळे यांचा मुलगा संकेत याचे नागपूर हिट अँड रन अपघात प्रकरणी अद्याप मेडिकल का झाले नाही, असा सवाल उपस्थित केला होता. तर संजय राऊत यांनी या प्रकरणातील तिन्ही जणांनी हॉटेलात बीफ खाल्याचा आरोप केला. सुषमा अंधारे यांच्या आरोपाला उत्तर पोलिसांनी दिला. तर संजय राऊत यांच्या प्रश्नाचं उत्तर हॉटेल मालकाने दिलं असल्याचं म्हणत या आरोपांवर बावनकुळे यांनी अधिक बोलण टाळलं.





गोंदिया भंडाराचे खासदार प्रकाश पडोळे यांच्या गाडीच्या बोनटवर बसून पूरपरिस्थिती पाहणी करत असल्याच्या व्हिडिओ वर बोलतांना त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. भंडारा - गोंदियाची जनता लवकरच निर्णय घेईल असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं.





बडनेरा मतदार संघातून रवी राणा यांनी उमेदवारी मागितली असल्याचं म्हणत आम्ही आमचे जे कार्यकर्ते नाराज होतील त्यांना सांभाळू असही बावनकुळे म्हणाले.



भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज अकोला दौरा प्रसंगी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीवर टीका केली.




भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद


अकोला जिल्हा दौऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकाळी मुर्तीजापुर विधानसभा क्षेत्रातील प्रमुख भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी बूथस्तरापासून आत्तापासूनच तयारीला लागण्याचा सूचना त्यांनी केल्या.





यावेळी प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, रावसाहेब कांबे, भूषण कोकाटे, गिरीश जोशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









टिप्पण्या