- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ganesh-festival-akola-crime-: घुसर येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत वाद; दोघांवर चाकूने हल्ला, गावात तणावपूर्ण शांतता
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : अकोला जिल्ह्यातील घुसर गावात आज गणपती विसर्जन मिरवणूकीत वाद निर्माण होवून मिरवणूकीत 4 ते 5 युवकांनी गर्दीचा फायदा घेत दोन युवकांना चाकूने भोकसल्याची घटना घडली. विठ्ठल पागृत आणि शुभम रहाणे अशी जखमींची नावे असल्याचे कळते.
पूर्व वैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याचं बोलल जात आहे. चाकू हल्ला करून सर्व आरोपी फरार झालेत. या दोन जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून, अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे. तर एकावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
या हल्ल्यानंतर गणेश भक्तांनी गणपतीची मिरवणूक थांबवली आहे. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मिरवणूक पुढे न घेण्याचा निर्णय मंडळांनी घेतला. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून, घुसर गावात तणावपूर्ण शांतता पसरली असल्याचे समजते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा