- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: जिल्ह्यातील मोरगाव भाकरे गावात एका घराचं छत कोसळल्याने मनोहर वानखडे नामक 60 वर्षीय व्यक्तीचा भिंतीखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी 8 च्या सुमारास घडली. घटनेच्या वेळी मनोहर वानखेडे हे घरात एकटेच होते. मनोहर वानखेडे या घरात एकटेच राहायचे.
अकोला जिल्ह्यात काल पासून संततधार मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे अनेक नदी नाले ओसंडून वाहत आहेत. तसेच अनेक नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरलं. दरम्यान आज दुपार पासून पावसाने विश्रांती घेतली आहे.
जिल्ह्यातील मोरगाव भाकरे गावातील भारतीय सैन्यातील प्रवीण जंजाळ यांना काश्मीर मध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत वीर मरण आलं. शाहिद प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर आज मोरगांव भाकरे गावात शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
तर आज सकाळी 60 वर्षीय मनोहर वानखेडे यांचा छत कोसळल्याने अपघाती मृत्यू झाला. एकाचं गावातील दोघांचे अकाली निधन झाल्याने संपूर्ण गावात दुःखाचे सावट पसरले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा