police-custody-death-case-akot : गोवर्धन हरमकर पोलीस कोठडी मृत्यु प्रकरण: पाच आरोपी पोलिसांचा अटकपूर्व जमानतअर्ज अकोट न्यायालयाने फेटाळला






भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोट येथे मोबाइल चोरी प्रकरणातील आरोपी गोवर्धन हरमकर याचा पोलीस कोठडी दरम्यान मृत्यु झाला होता. हरमकार याच्या मृत्यूचा ठपका पाच पोलिसांवर ठेवण्यात आला आहे. या पाचही आरोपींनी अकोट न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज सादर केला होता. मात्र न्यायलयाने अर्ज फेटाळून लावला.



आज 18 जुन रोजी अकोट येथील  जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनचे फाईल वरील अपराध क्रमांक 169/2024 भादंवि. चे कलम 302, 34 मधील सर्व पाच आरोपी जे अकोट शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस शिपाई म्हणून आहेत. यामध्ये रवि सदाशिव, मनिष कुलट, विशाल हिवरे,  प्रेमानंद पचांग,  सागर मोरे यांनी मृतक गोवर्धन हरमकार कष्टडी डेथ प्रकरणात दाखल केलेला अटकपुर्व जमानत अर्ज नामंजुर (फेटाळला) आहे. त्यामुळे या प्रकरणात सी.आय.डी. अमरावती पोलीस  आरोपींना कधी अटक करतात याकडे अकोट येथील सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागलेले आहे.


या प्रकरणात सरकारतर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी जमानत अर्जावर लेखी उत्तर सादर करून युक्तीवाद केला. 16 एप्रिल 2024 रोजी मृतक गोवर्धन हरमकार याचे काका सुखदेव हरमकार यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला की, त्यांचा पुतण्या  गोवर्धन हरमकार याला दि. 15 जानेवारी 2024 रोजी अकोट शहर पोलीस स्टेशनचे उपनिरिक्षक जवरे यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनला नेले. तसेच 16 जानेवारी रोजी पी.एस.आय. जवरे व इतर 3 पोलीस कर्मचारी यांनी रात्री 8 ते 9 च्या सुमारास सुकळी येथे आणले. पोलीसांनी तेव्हा मारहाण केली व मला सुध्दा अकोट शहर पोलीस स्टेशनला आणले व पोलीस अकोट शहरला मला सुध्दा मारहाण केली. त्याला भरपुर मार असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला अकोट सरकारी दवाखाण्यामध्ये रेफर केले. परंतु त्याला सरकारी दवाखाण्यात न नेता अकोला येथे खाजगी दवाखाण्यात नेले व 17 जानेवारी रोजी उपचारा दरम्यान अकोला यथे गोवर्धनचा खाजगी हॉस्पीटलमध्ये मृत्यु झाला. त्याचे पी.एम झाल्यानंतर प्रेत सुकळी येथे न नेता मोहता मिल मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करून जाळण्यात आले, अशा लेखी रिपोर्ट वरून गुन्हा आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.


गुन्हयाच्या तपासात असे दिसुन आले की, 07 जानेवारी रोजी अकोट शहर पोलीस स्टशन येथे दाखल गुन्हा   कलम 392 भादंवि. चा तपास पी.एस.आय. जवरे यांचेकडे देण्यात आला होता. 10 जानेवारी रोजी गोवर्धन हरमकर यास ताब्यात घेतले. मोबाईल फोन चोरले बाबत व काढुन देणेबाबत विचारणा केली.  फिर्यादी सुखदेव व गोवर्धन याला पोलीस स्टेशनला आणुन मारहाण केली. त्याबाबत गावातील व पोलीस स्टेशनमध्ये हजर असलेले साक्षीदार यांनी बयाणात सांगितले आहे. तसेब घटनेच्या कालावधीमध्ये सर्व आरोपी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे प्रगटीकरण पथक मध्ये नेमणुकीस होते. घटनेच्या कालावधीमध्ये कर्तव्यावर हजर असल्याबाबतचे पोलीस स्टेशनचे डयुटी चार्ज व दैनंदिन गणणेवरून दिसुन येते.


सरकारी वकील अजित देशमुख यांनी न्यायालयास निदर्शनास आणुन दिले की, गोवर्धन हरमकार यांचे शवविच्छेदन अहवालाची पाहणी केल्यास त्याचे शरीरावर 25 जखमांचा उल्लेख डॉक्टरांनी केलेला आहे व मरणाचे कारण या जखमांचा शॉक लागल्यामुळेच मृत्यु झाला असे नमुद केले आहे. तसेच पी. एम. रिपोर्ट च्या कॉलम क्र. 17 मध्ये नमूद असलेल्या जखमा हया रस्ते अपघातात किंवा स्वतः दारू पिऊन वारंवार पडल्यामुळे होवू शकत नाही. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्याचा अभिप्राय प्राप्त आहे. त्यावरून सदर जखमा हया मारहाणीच्या असल्याचे निष्पन्न होते. फिर्यादी व साक्षीदार हे आरोपींना चेहऱ्याने ओळखतात. पण नावाने ओळखत नसल्याने त्यांची ओळख परेड घेणे अत्यंत आवश्यक आहे. आरोपी हे डि. बी. पथकातील असून, त्यापैकी कोणी कोणी मारहाण केली याबाबत विचारपूस करणे अत्यंत गरजेचे आहे व त्याकरीता सर्व आरोपींची पोलीस कोठडीमध्ये चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय या अत्यंत गंभीर तपासाची दिशा ठरविता येणार नाही. तसेच या गुन्हयामध्ये या आरोपींपैकी कोणाची काय भुमिका होती, याबाबत फिर्यादी व साक्षीदार यांना आरोपी दाखविल्या शिवाय कळणार नाही. आरोपींना अटकपुर्व जामीन दिल्यास आरोपी साक्षीदारावर दबाव आणुन तपासात अडथळा निर्माण करू शकतात. आरोपी हे डि.बी. पथकातील पोलीस कर्मचारी असल्याने गुन्हेगारी विश्वासंबंधी त्यांना संपुर्ण माहिती असल्याने त्यांना अटकपूर्व जामीन मिळाल्यास ते साक्षीदारांच्या जीवीतास इतर गुन्हेगाराच्या मदतीने धोका निर्माण करू शकतात. तसेच मृतकास मारहाण झाली आहे, त्यासंबंधी वस्तु, शस्त्र या गुन्हयात बाकी आहे. तसेच आरोपींचे मोबाईल फोन जप्त करणे गरजेचे आहे व सदर गंभीर प्रकरणाचा तपास सी. आय. डी अमरावतीच्या पोलीस उपअधिक्षक दिप्ती ब्राम्हणे करित असुन, तपास हा अजुन पुर्ण झालेला नाही व प्राथमिक स्तरावर आहे. वरील कारणांमुळे आरोपींचा अटकपुर्व जामीनाचा अर्ज नामंजुर करण्यात यावा, असा युक्तीवाद सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी विद्यमान न्यायालयात केला. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायलयाने आरोपींचा अटकपुर्व जमानत अर्ज नामंजुर केला आहे.

टिप्पण्या