lok-sabha-elections-2024-akl: बाळासाहेब आंबेडकर यांच्याकरिता अजूनही रस्ते बंद झाली नाहीत - नाना पटोले; डॉ. अभय पाटील समर्थनार्थ उसळला जनसागर





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : नाना पटोले यांनी दिलेला शब्द पाळला आहे. 4 तारखेला अकोल्यात येऊन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना उत्तर देणार असल्याचं काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते. अकोल्यात आज त्यांनी वांचीतला ऑफर दिली. तुमच्या 2 जागा कोणत्या हे वंचितने सांगावं त्या जागेचा निर्णय आपण पक्ष श्रेष्ठींना न विचारता देतो. नाना पटोले यांना काय अधिकार आहेत, हे त्यांनतर दिसेलच, असे नाना पटोले यांनी सांगितले.





आज अकोला लोकसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. अभय पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नाना पटोले हे मुंबईहून अकोल्यात आले होते. यावेळी राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे आणि आ.वजाहत मिर्जा त्यांच्या सोबत होते.





दुपारी स्वराज भवन प्रांगणात डॉ. अभय पाटील यांच्या समर्थनार्थ नाना पटोले यांची जाहिर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. 




नाना पटोले हे प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी सकारात्मक असल्याचं पटोले यांच्या वक्तव्यावरून पुढे आलं आहे. अकोल्यात नाना पटोले यांनी पुन्हा 'काँग्रेसचा' हात पुढे केला आहे. अजून वेळ गेली नसून त्यांच्यासाठी दोस्तीचा हात पुढे आहे, त्यांनी आताही निर्णय घ्यावा, असे आवाहन नाना पटोले यांनी केलं आहे. आंबेडकरच नाही तर वंचितचे पदाधिकारी सुद्धा आपल्यावर आरोप का करत आहेत, हे मात्र मला अजूनही समजलं नाही ते का टीका करतात, असेही नाना पटोले म्हणाले. तर नागपूरच्या आमच्या उमेदवाराला पाठिंबा का दिला हे वेळ आल्यावर सांगेल, असा इशाराही त्यांनी दिला.





बाळासाहेब आंबेडकर हे खरगे साहेबांना भेटले नाहीत. त्यांच्या माणसांना भेटण्यास पाठविले. प्रतिनिधी सोबत कांय बोलणार,असे खरगे साहेब यांनी म्हंटले होते. बाळासाहेब आंबेडकर यांनी केवळ पत्र पाठविले आहेत. त्यांच्या करिता अकोल्याचा कँडिडेड शेवट पर्यंत डिक्लेअर केला नाही. मात्र मॅच फिक्सिंग चा आरोप माझ्यावर केला जातो. मात्र नाना पटोलेच्या रक्तात मॅच फिक्सिंग नाही, असे ठामपणे नाना पटोले यावेळी म्हणाले.


लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र काम करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात मत विभाजन होऊ नये. बाळासाहेबांकरता अजूनही माविआचे रस्ते बंद झाली नाहीत. महराष्ट्रात मत विभाजन  करुन देशाला बरबाद करण्याचं काम करू नये. आम्ही विड्रॉल पर्यंत वाट बघू, असे देखील नाना पटोले म्हणाले.



राज्यात धर्मांध व्यवस्था निर्माण झाली आहे. धर्म, नीती, नीतिमत्ता संपुष्टात आणण्याचे काम या सरकारने केले आहे, असे देखील नाना पटोले यांनी म्हंटले. तर नाम उल्लेख न करता,  खासदार सध्या व्हेंटीलेटरवर असून हे लोक त्यांचं व्हेंटीलेटर कधी काढणार, हे सांगता येत नाही. कदाचित निवडणुकीतच काढतील, असं  वादग्रस्त विधान यावेळी नाना पटोले यांनी केले.


काँग्रेस पक्षाचा विजय 

गेल्या 30 वर्षांपासून मी समाजात चांगले काम केले असून या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजय होईल, असा विश्वास उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी व्यक्त केला. याप्रसंगी मान्यवर नेत्यांनी उपास्थित जनतेला मार्गदर्शन केले.




स्वराज भवन प्रांगणात ही सभा पार पडली. यावेळी महाविकास आघाडी उमेदवार डॉ. अभय पाटिल यांचे सह सर्व पक्षाचे प्रमुख नेते चंद्रकांत हांडोरे, वसंत पुरके, आमदार नितीन देशमुख, अजहर हुसेन, मदन भरगड संग्राम गावंडे, गजानन दाळू गुरुजी, विवेक पारस्कर , प्रकाश तायडे गुलाबराव गावंडे, आशा मिरगे, साजिद पठाण, हरिदास भदे, सुभाष कोरपे, धीरज लिंगाडे, श्यामभाऊ उमाळकर, रफिक सिद्दिकी, अनिस अहमद, नतीकोदिन खतीब, देवाश्री ठाकरे, जोशना चोरे, डॉक्टर रेखा पाटील, अमित झनक आदी मान्यवर मंचावर विराजमान होते. 


यावेळी महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, डॉ .पाटिल यांचे कुटुंबिय आणि प्रचंड जनसमुदाय आपले समर्थन डॉक्टर अभय पाटील यांना देण्यासाठी उपस्थित होते.





डॉ. अभय पाटील यांनी केला अर्ज दाखल 




कॉंग्रेसचे उमेदवार डॉ.अभय पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नाना पटोले आज अकोला येथे सभा स्थळी उपस्तीत होते, नामनिर्देशन पत्र दाखल करतांना आज डॉ.अभय पाटील यांच्या सह शिक्षक आमदार धीरज लिंगाडे,खासदार चंद्रकांत हांडोरे सह इतर पदाधिकारी उपस्तीत होते. डॉ.अभय पाटील यांच्या सोबत  राष्ट्रवादी काँग्रेस श. प गटाचे स्थानिक नेते तसेच शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) यांचे कडून आमदार नितिन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, दाळू गुरुजी, माजी आमदार संजय गांवडे, माजी आमदार हरिदास भदे, सेवकराम ताथोड, निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, उपजिल्हाप्रमुख गजानन बोराळे,  महिला जिल्हा संघटिका देवश्री ठाकरे, जोसना चोरे, मनिषा मते, रेखा राऊत, योगेश्वर वानखडे, राहूल कराळे, नितिन मिश्रा, नितीन ताथोड आदी उपस्थित होते.




टिप्पण्या