- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला : राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मित्र मानल्या जाणारे तथा "चाय बेचने वाला पूरा भारत बेच रहा है" या गीताने संपूर्ण देशात लोकप्रिय झालेले शायर तथा काँग्रेसचे राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी यांनी सोमवारी आपल्या शैलीत पुन्हा अकोल्यात नवीन गीत ‘ मोदीजी बाय बाय…मोदीजी बाय बाय ‘ सादर केलं. या गीताला प्रेक्षकांनीही भरभरून दाद दिली.
अकोला लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अभय पाटील यांच्या प्रचार सभेत त्यांनी उपस्थितांसमोर ‘मोदीजी बाय बाय’ हे नवीन गीत सादर केले. आपल्या या गीतातून इम्रान प्रतापगढी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
video link: इम्रान प्रतापगढी यांच्या ‘मोदीजी बाय बाय’ गीतावर लोकांनी धरला ठेका
या गीतातून इम्रान प्रतापगढी यांनी शेतकऱ्यांची व्यथा , महिला सुरक्षितता या सारख्या अनेक मुद्द्यांवर टिप्पणी केली आहे. त्यांच्या या नवीन गीतात ' मोदीजी बाय बाय ' चा उल्लेख करत टीका केली. त्यांच्या या गीतावर उपस्थितांनी भरपूर आनंद लुटत मंचासमोर डान्स ही केला.
Abhay patil
Akola Constituency
BJP
Congress
Imran pratapgadhi
Imran Pratapgarhi
Narendra Modi
vidarbha
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा