lok-sabha-election-akola-2024: काँग्रेसचे डॉ. अभय पाटील आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांचे आज शक्ती प्रदर्शन; नाना पटोले यांच्या उत्तराकडे ‘वंचित’ चे लक्ष !




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोला लोकसभा मतदार संघाकरिता नामनिर्दशनपत्र भरण्याची आज शेवटची तारीख आहे. यामुळे आज इच्छुक उमेदवारांची निवडणुक प्रचंड गर्दी राहणार आहे. काँग्रेसचे उमेदवार डॉ.अभय पाटील तर्फे आज महाविकास आघाडी घटक पक्षांच्या नेत्यांसोबत शक्तिप्रदर्शन करत नामांकन अर्ज दाखल करण्यात येणार आहे.



यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आवर्जून उपस्थित राहणार आहे. वंचित बहुजन आघाडी सोबत बोलणी सुरू असताना काँग्रेसने अकोल्यात आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्या सोबतच प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले यांच्यावर लावलेल्या आरोपांचं उत्तर अकोल्यात देणार असल्याचं नाना पटोले म्हणाले होते. त्यामुळे नाना पटोले डॉ.अभय पाटील यांच्या नामांकन अर्ज दाखल करण्याकरिता अकोला आगमनप्रसंगी काय बोलतात याकडे व्हीबीए सह सर्वांचे लक्ष लागले आहे.



भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी काल नामांकन अर्ज दाखल केले आहे. तर आज नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सुद्धा आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहे. आंबेडकर यांनी याआधी एक नामांकन अर्ज चाचपणीसाठी भरला होता. आज आंबेडकर शक्तिप्रदर्शन करत आपला अर्ज दाखल करणार आहेत.

दुसरीकडे भाजपचे नाराज आमदार नारायण गव्हाणकर सुद्धा नामांकन अर्ज भरणार आहे. अकोल्यात महाविकास आघाडीने आपला उमेदवार दिल्यानंतर अकोल्यात तिरंगी लढतीचे चित्र आहे.




दरम्यान, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 06- अकोला लोकसभा मतदार संघासाठी बुधवार 3 एप्रिल रोजी 6 व्यक्तींनी 9 नामनिर्देशनपत्रे दाखल केली. दुपारी 3 वाजेपर्यंत 6 व्यक्तींनी 11 अर्जांची उचल केली. आतापर्यंत 141 अर्जाची उचल अकोला लोकसभा मतदार संघासाठी झाली आहे.





अशोक थोरात (अपक्ष), रत्नदीप गणोजे (अपक्ष), अभय पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे दोन अर्ज), काशिनाथ धामोडे (बहुजन समाज पार्टीतर्फे दोन अर्ज), अनुप धोत्रे (भारतीय जनता पार्टीतर्फे दोन अर्ज), शेख नजीब शेख हबीब (इंडियन नॅशनल लिग) यांनी अर्ज दाखल केले आहेत.







टिप्पण्या