lok-sabha-election-2024-akola महायुतीच्या सभेकरिता बनलेला स्टेज अखेर काढला; आदर्श आचारसंहितेचा भंग, ‘वंचित’च्या तक्रारीची दखल




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अकोला लोकसभा मतदार संघात नामांकन अर्ज दाखल करायला सुरुवात झाली असून 4 एप्रिल ही शेवटची तारीख आहे. याकरिता आता सर्वच पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा हालचालीला सुरुवात केली आहे. 3 एप्रिल रोजी महायुतीचे अकोला लोकसभा करिता असलेले उमेदवार अनुप धोत्रे हे नामांकन अर्ज भरणार आहेत. यावेळी त्यांच्या सोबत भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सुद्धा उपस्थित राहणार आहेत. नामांकन अर्ज भरल्यानंतर भाजप तर्फे सभेचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे. याकरिता सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर भर रस्त्यावरच स्टेज उभारण्यात आला होता .मात्र यावर वंचित बहुजन आघाडीने आक्षेप घेत याची तक्रार निवडणूक विभागाकडे केली. अशाप्रकारे रस्ता अडवून आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार वंचितने केली. यानंतर निवडणूक विभागाने या तक्रारीची गंभीर दखल घेत आयोजकांना रस्त्यावर उभारण्यात आलेला स्टेज त्वरित काढण्याचे निर्देश दिले. यानंतर लगेच हा स्टेज काढण्यात आला.






भाजपाला वंचितचा तिसरा दणका!



जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता अडवून स्टेज टाकून भाजप उमेदवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि डझनभर भाजप नेत्यांसाठी थेट रस्त्यांवर स्टेज उभारला जात होता. आचार संहिता केवळ इतर पक्षा साठी आहे का ? अशी विचारणा करीत वंचित कडून प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे ह्यांनी सिव्हिजील ॲप वर तक्रार दाखल करताच निवडणुक विभागाने स्टेज काढून टाकण्याचे आदेश दिले. अकोला जिल्ह्यात वंचितने दिलेला हा तिसरा दणका ठरला.



निवडणुक नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी 3 तारखेला भाजप उमेदवार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि डझनभर भाजप महायुतीच्या नेत्यांसाठी थेट रस्त्यांवर स्टेज उभारला जात होता. ह्या पूर्वी कुठल्याही राजकीय पक्षाचे साठी थेट रस्त्यांवर स्टेज उभारण्याची परवानगी प्रशासनाने दिली नव्हती. सत्ताधारी भाजप साठी नियम धाब्यावर बसवून सुरू असलेले स्टेज बाबत वंचित बहुजन आघाडीने सी व्हिजील ॲप वर तक्रार दाखल केली. भाजपला जर स्टेज उभारू दिला तर आम्ही पहिली सभा जिल्हाधिकारी कार्यालय येथे नियोजन भवनात घेवू आणि कुठलीही परवानगी घेणार नाही असा इशारा देताच निवडणुक विभागाने तातडीने स्टेज काढून टाकण्याची कार्यवाही केली.



यापूर्वी फोर्स मोटर्स कडून आदर्श आचारसंहिता लागू असताना एका दैनिक वृत्तपत्रात भाजपा नेते तथा पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि भारतीय सैन्य दलाच्या जवानांची छायाचित्रे असलेली जाहिरात प्रकाशित केली होती. तसेच भाजप प्रचार रथ जिल्हाधिकारी कार्यालय येथे असल्याची तक्रार दाखल केली होती.त्यावर दोन्ही प्रचार रथचालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता हा वंचित कडून भाजपला दिलेला तिसरा दणका ठरला असल्याचा राजकिय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.

टिप्पण्या