lok sabha election 2024 akl: प्रकाश आंबेडकरांचा पराभव करण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील - देवेंद्र फडणवीस; अनुप धोत्रे यांचा नामांकन अर्ज दाखल




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अकोला लोकसभेचे भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी आज आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे. शक्ती प्रदर्शन करीत त्यांनी हा नामांकन अर्ज भरला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेते प्रवीण पोटे, महायुतीचे स्थानिक नेते , अनुप धोत्रे यांची आई आणि पत्नी सह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.





पारंपारिक वेशभूषा ठरली आकर्षण 


खुले नाट्यगृह ते जिल्हाधिकारी कार्यालय ही रॅली काढण्यात आली यावेळी ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करण्यात आला. पारंपारिक वेशभूषा करुन बंजारा महीला मंडळांनी आणि गोंधळी लोकांनी रॅलीत नृत्य करीत भारतीय परंपरेचे दर्शन घडविले. तर मोदी यांचा छापील फोटो असलेले जॅकेट घालून भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते विजय संकल्प रॅलीत सहभागी झाले होते.




देवेंद्र फडणवीस यांची जाहिर सभा



पवार म्हणजे शरद पवार नव्हे




आपल्या जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस यांनी आपला उमेदवार विजय होईल याची खात्री करून दिली. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत पाडण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करायची आता सुध्दा प्रकाश आंबेडकर यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आपला विजय सहज होईल, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस वर टिका केली आहे. तर पवार म्हणजे शरद पवार नव्हे अजित पवार कन्फ्युजन नको म्हणत सभेत हसा पिकविला.







“जो मोदींचा नाही तो जनतेचा नाही”, असे म्हणत उन्मेष पाटिल यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस हे यावेळी प्रसार माध्यमांशी बोलत होते.






“येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना शेती सोबत जोड धंदा आणि युवकांना रोजगार संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार, असे यावेळी भाजपा महायुती उमेदवार अनुप धोत्रे म्हणाले.










यांचा होता रॅलीत समावेश 




भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई,  शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या नामांकन पत्र आज  3 एप्रिल बुधवार रोजी भाजपा कार्यालय  येथून राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संजय कुटे, आमदार अमोल मिटकरी, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार आकाश फुंडकर, आमदार श्वेता महाले, माजी आमदार चैनसुख संचेती, माजी आमदार विजयराव जाधव, माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, विजय अग्रवाल, माजी आमदार वसंतराव खोटेरे, आमदार लखन मलिक, माजी आमदार तुकाराम बिडकर, विजयराव देशमुख, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, श्रीराम  पिंजरकर, संदीप पाटील, श्याम बडे, अनंतराव देशमुख, नकुल देशमुख, कृष्णा अंधारे, उषा विरक, अश्विन नवले, विठ्ठल सरप, योगेश अग्रवाल, सुनील अवचार, वैशाली निकम, चंदा शर्मा, गीतांजली शेगोकार, सुमन गावंडे, वैशाली शेळके, विलास शेळके, चंद्रशेखर पांडे गुरुजी, श्रीकृष्ण मोरखडे, किशोर मांगटे, जयंत मसने, विजय अग्रवाल तेजराव थोरात बळीराम सिरस्कार, योगेश शाहू, कुसुम भगत मोनिका गावंडे, जयश्री फुंडकर हरिनारायण माकोडे, राजेश रावणकर, शंकरराव बोरकर, बाळासाहेब आपोतीकर, हिरासिंग राठोड, रमण जैन, एडवोकेट मोतीसिंह मोहता, डॉक्टर अशोक ओलबे, योगेश अग्रवाल उमादेवी शर्मा, कृष्णा शर्मा, संजय बडोणे , हरीश आलीमचंददाणी, विनोद  मनवाणी  , संतोष पांडे, निलेश निनोरे अंबादास उमाळे देवेंद्र देवर, नानक राजपाल, एडवोकेट सुभाष ठाकूर , सिद्धार्थ शर्मा, अभय जैन, डॉक्टर किशोर मालोकार, डॉक्टर राजेश देशपांडे, शुभराज राजपाल, मनीराम टाले, उमेश पवार, धनंजय धबाले, सारिका देशमुख, सारिका जयस्वाल, गिरीश जोशी, गिरिराज तिवारी, सुनील कोरडीया यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, तालुका पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, महायुतीचे हितचिंतक तसेच सामाजिक, धार्मिक, अध्यात्म व वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, आर्थिक क्षेत्रातील मान्यवर नामांकन पत्र दाखल करताना उपस्थित होते. 




टिप्पण्या