- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : मी काम करतो म्हणून संयमता बाळगतो, असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आज अकोल्यात शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या निवासस्थानी अल्पोहार ( नाश्ता ) साठी आले असता ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बाजोरिया कुटुंबीयांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोटोसेशनही केल. तर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा बाजोरिया यांच्या संपूर्ण कुटुंबीयांसोबत फोटो सेशन मस्त मूडमध्ये केला.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली आहे. उद्धव ठाकरे सध्या वैफल्यग्रस्त झाले असून, ते वैफल्यातून वक्तव्य करत असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तर शिखर बँक घोटाळा प्रकरणी चौकशी अंतिम जे समोर येईल, त्यानंतर त्यावर निश्चितपणे कारवाई केली जाणार असल्याचा इशारा यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिला. जागावाटपचा तिढा लवकरच सन्मानपूर्वक दूर होणार असा विश्वासही त्यांनी दर्शविला आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा