akola-city-crime-murder-case: एकाच रात्री घडले दुहेरी हत्याकांड; काही तासातच आरोपी अटकेत, रामदास पेठ पोलिसांची यशस्वी कामगिरी

दोन आरोपी रामदास पेठ पोलिसांच्या ताब्यात 


भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: रामदासपेठ पोलीस ठाणे पोलिसांनी धडक कार्यवाही करून, एकाच रात्री घडलेल्या दोन हत्याकांड प्रकरणात काही तासात आरोपींना अटक करुन दोन्ही गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळविले आहे.






18 एप्रिल रोजीचे रात्री 12.55 वाजताच्या सुमारास जैन कटलरीच्या समोर गुजराती स्वीट रेल्वे स्टेशन अकोला परीसरात तीन अज्ञात इसमांनी  अतुल लक्ष्मण थोरात (वय 30 वर्ष रा. अशोक नगर, अकोट फैल अकोला ) यांना क्षुल्लक कारणावरुन धारधार चाकुने पोटात व मानेवर वार करुन जखमी केले. उपचारा दरम्यान जखमीचा मृत्यु झाला, असा फिर्यादी  शैलेश मधुकर वाघमारे (वय 32 वर्ष रा. अशोक नगर अकोला) यांचे जबानी रीपोर्ट वरुन पो.स्टे. अप.न.166/ 24 कलम 302,34 भादंवी चा दाखल करण्यात आला. 

                     घटनास्थळ


यानंतर पोलीस घटनास्थळवर हजर असतांना रामदासपेठ पोलीसांना माहीती मिळाली की, आज रात्री 1.30 वाजताचे सुमारास येथे जुन्या वादाचे कारणावरुन तीन इसमांनी राज संजय गायकवाड (वय 19 वर्ष रा. बजरंग चौक, विजय नगर अकोला) यांना धारधार चाकुने पोटात व मानेवर वार करून जख्मी केले. सदर जख्मी याचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. फिर्यादी  ऋषीकेश संजय गायकवाड (वय 23 वर्ष रा विजय नगर अकोला) यांचे फिर्याद वरून पो. स्टे. ला अप न 167/24 कलम 302,34 भादंवि चा गुन्हा दाखल झाला.


                       मृतक


दोन्हीं गुन्हयाचे तपासात पो. स्टे. तपास पथकाने सदर घटनास्थळाची सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारचे माहिती वरून आरोपी मनिष शरद भाकरे (वय 21 वर्ष), ऋषीकेश दीपक आपोतीकर (वय 20 वर्ष) (दोन्ही रा. देशमुख फैल अकोला) व आणखी एक  (रा माता नगर ) यांना या गुन्हे प्रकरणात चौकशी कामी विश्वासात घेवुन विचारपुस केली असता, त्यांनी जैन कटलरीच्या समोर गुजराती स्वीट रेल्वे स्टेशन अकोला येथे अतुल लक्ष्मण थोरात यांची हत्या केल्याची तसेच विजय नगर येथील राज संजय गायकवाड अकोला यांची आम्ही तिन मित्रांनी मिळून एकाच रात्री दोन खुन केल्याची कबुली दिली. यावरून एकाच रात्री घडलेल्या दोन्ही खुनाचे गुन्हे काही तासाचे आत उघडीस आणून आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. या दुहेरी हत्याकांड मध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.


ही कामगीरी बच्चन सिंग पोलीस अधिक्षक अकोला, अभय डोंगरे अपर पालीस अधिक्षक, सतिष कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी, मनोज बहुरे यांचे मार्गदर्शनाखली स.पोनि. के. डी. पवार, महिला पोलीस उपनिरीक्षक मिरा सोनुने, स.पो.उपनि सदाशिव सुळकर तसेच शेख हसन शेख अब्दुल्ला, किरण गवई, श्याम मोहळे,  अनिल धनभर, संदिप वानखडे, पुजा यंदे (सर्व  रामदापेठ, अकोला) यांनी केली.

टिप्पण्या