political-news-amit-shah-akl : काँग्रेसने तुष्टीकरण राजकारण केले, परंतु पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशात नवीन समाजकारण राजकारणाची सुरूवात - अमित शाह यांचे वक्तव्य




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: काँग्रेसने तुष्टीकरण राजकारण केले, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात नवीन समाजकारण राजकारण व समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं सबका साथ सबका विकास करण्याचा कार्यक्रम सुरू झाला. योजनेचा लाभ संपूर्ण बहुमत असताना सुद्धा केवळ समाजातील सर्व घटकांना अन्न रोजगार गॅस रोज विकास कामे पाणी उपलब्ध करून देण्याचं काम केलं त्यामध्ये मुस्लिम दलित आदिवासी ओबीसी असा कोणताही भेदभाव न करता सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केलं आहे. लोकांची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परत तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी आरूढ करण्याची इच्छा असून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कल्पकतेने जनतेशी संवाद साधा. देशाला विकसित करण्याचा लक्षपूर्ती करून जगातील तिसरा शक्तिशाली राष्ट्र निर्माण करण्यासाठी कामाला लागा. लोकसभा विजयीचा व प्रत्येक निवडणुकीमध्ये काम करण्याचा लक्ष करण्यासाठी अनेक मंत्र  विजय मंत्रकेंद्रीय गृहमंत्री व सहकारीता मंत्री अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना दिले. 



कार्यकर्ता भाजपाची संपत्ती असून कार्यकर्त्यांची भेट घेतल्यामुळे आपल्याला ऊर्जा प्राप्त होऊन आपण पक्ष विस्तारासोबत देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाईक म्हणून कार्यरत असून या देशातील बूथ प्रमुख राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता होऊ शकतो. हे केवळ भारतीय जनता पक्ष करू शकते, असे देखील  अमित शाह म्हणाले.




अकोला, बुलढाणा, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ वाशिम आणि वर्धा लोकसभा मतदार संघातील भाजपा संचालन समिती व पदाधिकाऱ्यांच्या संघटनात्मक व लोकसभा पूर्वतयारीच्या बैठकीत ते बोलत होते. 





स्थानिक बाळापुर रोड येथे हॉटेल ग्रँड जलसा येथे आज त्यांचे आगमन झाल्या प्रसंगी ते बोलत होते. मंचावर राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर विराजमान होते.




भाजपा सकारात्मक निवडणूक लढत असून भारतीय जनता पक्षाला जनतेच्या मनातला लोकनेता जनतेला अभिप्रेत नेता प्राप्त झाला आहे व प्रत्येक वार्डात प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारा भाजपाला कार्यकर्ता प्राप्त असल्यामुळे भाजपाचा हा विजयाचा मंत्र असून आधार आहे,असे अमित शाह म्हणाले.



भारतीय जनता पक्ष 2024 ची निवडणूक ही जिंकणारच आहे. परंतु भारतीय जनता पक्ष 25 वर्षाचा लक्ष घेऊन भारतीय जनता पक्षाच्या चार पिढीने केलेल्या संघर्ष त्या तपस्या बलिदान याला नमन करून त्यांनी अनेक कष्ट सहन करून पक्ष विस्तारासाठी विपरीत परिस्थिती काम केले. आता सध्या चांगली परिस्थिती असताना येणाऱ्या पिढीला अजून चांगलं काम करता यावं यासाठी भारतीय जनता पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. 



1950 पासून जनसंघाच्या स्थापनेपासून  तपस्या करणारे अनेक घर दार विकून कोणतीही अपेक्षा न ठेवता पक्षाचे काम करणाऱ्या पूर्वजांना नमन करायची गरज आहे.  शतप्रतिशद भाजपा निर्माण साठी कामाला लागा १९२५ ला डॉक्टर हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. त्यांनी या देशातील स्वराज्य ही कल्पना छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत स्वराज्य म्हणजे धर्म भाषा संस्कृती विचार यांचा संवर्धन करून सर्वांना सोबत घेऊन सुजलाम सुफलाम करण्याचा संकल्प केला आहे. त्याची आपण पाईक असल्याचा गौरव करून आपण कामाला लागा. ज्या काळामध्ये पक्षाला कोणीही उभा करत नव्हते. आज पक्षामध्ये प्रवेश करण्याची संख्या वाढत आहे. सातत्याने काम करणाऱ्या व पार्टीच्या विस्तारासाठी काम करणाऱ्या लोकांची गरज असून, त्यामुळे पण विचारांच्या लढाईसाठी सर्व समाजातील लोकांना पक्षाशी जोडा करा आणि नवीन आल्यामुळे नुकसान होणार नाही कोणताही पक्ष देत नाही तर घेत असतो त्यामुळे आपण राष्ट्र निर्माण साठी पक्षाच्या विस्तारासाठी आपल्या क्षेत्रातील मतदान मोठ्या प्रमाणात होणार यासाठी व आपल्या मतदान केंद्रावर भारतीय जनता पक्ष व महायुतीचा प्रत्येक उमेदवार हा आपणच आहे, या विचाराने कामाला लागा असे आवाहन नामदार अमित शहा यांनी दिला.





यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातून 45 पेक्षा जास्त लोकसभा निवडणूक जिंकण्याचा संकल्प करून विदर्भात दाही जागा महायुती जिंकणार असा विश्वास करून कार्यकर्त्यांनी महायुती धर्माचा पालन करावे विकास कामे करताना विश्वातील सर्वात मोठी पार्टी बनवणारे अमित भाई शाह यांच्या सातत्याने चिंतन म्हणून करून पक्ष विस्तारासाठी कार्यरत करता राहतात व मोदींची इच्छा नेतृत्वात राम मंदिर 370 कलम तीन तलाक व सर्वसामान्यांच्या इच्छापूर्ती झाली आहे त्यामुळे आपण एक दिलाने महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा संकल्प घ्या करूया अशी प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी केले.





तत्पूर्वी, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत अकोला विमानतळावर आगमन झाले.  महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केले. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह आदी उपस्थित होते.





त्यांनतर अमित शहा यांनी अकोला येथील शिवणी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रणधीर सावरकर आदी उपस्थित होते.





हजारो लोकांनी लाडके गृहमंत्री अमित शाह यांचे स्वागत केले.

अकोल्यात अमित  शाह राजराजेश्वर नगरीमध्ये प्रथम येत असल्याबद्दल नागरिकांमध्ये उत्साह होता आणि सकाळी पासून नागरिक रस्त्यावरच्या कडेवर उभे राहून उड्डाणपुलावर उभे राहून लाडके नेत्यांचा स्वागतासाठी सज्ज होते. शिवनी शिवर इथे जोरदार स्वागत आतिषबाजी पुष्पवृष्टी करण्यात आली. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून त्यांनी नागरिकांची अभिवादन स्वीकारले. राज्याचे  उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे राधाकृष्ण विखे पाटील भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर त्यांच्यासोबत होते. यावेळी भंत्यांनी आशीर्वाद देऊन विजयी भव हे संकल्प देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत कार्य व त्यांच्या केलेल्या कार्याचा गौरव करण्याची परंपरा सुरू केली आहे. लंडन येथील घर दिल्ली येथील घर तसेच महू येथील घर स्मारक उभा करण्याचे काम सरकारने केले असून नाणे आणि भारतरत्न सुद्धा भारतीय जनता पक्ष सरकारने देऊन त्यांच्या कार्याची शिकवण घेऊन संसदेमध्ये भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा प्रतिमा लावण्याचा काम भारतीय जनता पक्षाने केला आहे. केवळ भारतीय जनता पक्षाचा द्वेषबुद्धीने अपप्रचार करण्याचा प्रयत्न होत असला तरी भाजपावर जातीवादाचा आरोप लावणाऱ्यांना कृतीने अमित  शाह यांनी चपराक लावली आहे.

नेहरू पार्क मातृशक्तीच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आलं. भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीने सुहासिनी  धोत्रे, समीक्षा धोत्रे, अर्चना शर्मा, चंदा शर्मा, रश्मी कायंदे, निकिता देशमुख, रश्मी अवचार, मनीषा भन्साली, मंगला सोनवणे, आम्रपाली  उपरवट, श्रावण इंगळे, बाल टाले ,शारदा ढोरे ,शारदा खेडकर ,योगिता पावसाळे, हरीश आलीमचदानी, अजय शर्मा, विजय इंगळे, सुनीता अग्रवाल ,संतोष पांडे, गणेश अंधारे, संदीप गावंडे, अमोल साबळे, अमोल घुगे, दिलीप मिश्रा, अमोल गोगे, अमोल मोहकार, सुनील कांबळे, अंबादास उमाळे ,पंकज वाडीवाले, प्रवीण हगवणे, गोपाल मुळे, विलास शेळके, वैशाली शेळके, रंजना विंचनकर, सतीश ढगे, निलेश निनोरे, बुंदीले, जीरापुरे ,एडवोकेट देवाशिष काकड, सुमन गावंडे, हरीश काळे, मिलिंद राऊत, अनिल नावोकार, सुभाष खंडारे, आरती गुगलिया, अर्चना चौधरी, दीप मनवाणी, कन्हैया आहुजा आदी कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात शहरात आठ ठिकाणी भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. शिवनी शिवर महाकाली राधाकृष्ण टॉकीज जवळ नैहरु पार्क अशोक वाटिका लक्झरी स्टॅन्ड पत्रकार चौक वाशिम नाका व बाळापूर नाका येथे जोरदार स्वागत करण्यात आला.

भाजपा बूथप्रमुखांकडून स्वागत


भाजपा लोकप्रतिनिधी सोबत सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा केंद्रीय मंत्र्यांचा स्वागत करण्याचे सौभाग्य भारतीय जनता पक्षाने देऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान केला.

जिल्ह्यातील दहा बूथ प्रमुख तालुकाप्रमुख सह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व जिल्हा अध्यक्षांच्या स्वागत करण्याचा सौभाग्य मिळाला. नवीन परंपरा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मानाचा स्थान प्राप्त करून देण्याचा भाजपाचा प्रयत्न असतो. देवेंद्र देवर, अंबादास धेगे, राजेश मिश्रा, नरेंद्र गवळी, नितीन खोत, हरीश टावरी, शंकर जयराज, रितेश बाजकर, अर्चना मसने, संजय इंगळे, राजेश ठाकरे, सुधीर गावंडे, संतोष पांडे, दिलीप मिश्रा, रमेश लोहकपुरे, प्रमोद टेकाडे, राजेश रावणकर, रमेश करिहार, संदीप गावंडे या कार्यकर्त्यांनी स्वागत केले.


विरोधकांनी पोस्टर फाडले ! 

अमित शाह यांच्या भेटीमुळे अकोला शहर पूर्ण भाजपामुळे झाले होते. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी होल्डिंग लावले होते. शिवसेना राष्ट्रवादी तसेच भाजपाच्या वतीने लोकनेते अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचे  होर्डींग लावण्यात आले होते.भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या या प्रचारामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरून त्यांनी अमित शहा यांच्या स्वागताचे पोस्टर फाडण्याचा कर्तुत्व केला, असले तरी अकोल्याच्या संस्कृतीचे पालन भारतीय जनता पक्षाने करुन शांततेने आपल्या लोकनेतेच स्वागत केलं. 



अमित शाह हे पुढील दौरा साठी जळगाव कडे रवाना झाले. 



टिप्पण्या