Mild-earthquake-Akola-district: अकोला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य हादरे




भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला, दि. 26 : जिल्ह्यात बाळापूर तालुक्यात अंत्री मलकापूर परिसरात भूकंपाच्या सौम्य (2.9 रि. स्के.) धक्क्याची मंगळवार 26 मार्च रोजी सायंकाळी 6.27 वा. नोंद झाली, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे देण्यात आली.






मागील आठवड्यात मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली तसेच अकोला जिल्हयातील बाळापूर मध्ये भूकंप झाला होता, अशी चर्चा होती. मात्र, त्याची कुठेही नोंद झाली नव्हती. 


दरम्यान, काल मंगळवारी सायंकाळी अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. मात्र नागरिकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.






टिप्पण्या