- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : होळीची धूम देशभरात सुरू झाली आहेय रंगीबेरंगी रंगांची उधळण करत रंगउत्सवाचा आनंद सर्वजण लुटत आहेत. अकोल्यात ही धूम पाहायला मिळत आहे, शहरात अनेक ठिकाणी रंग उत्सवाला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे.
शहरातील मुंगीलाल शाळेच्या परिसरात श्रीराम ग्रुप तर्फे नैसर्गिक रंगांच्या होळीच आयोजन करण्यात आलं होतं. गाण्याच्या तालावर थिरकत सर्वांनी होळीचा आनंद लुटला. श्रीराम समूहा तर्फे मागील वीस पंचवीस वर्षांपासून नैसर्गिक रंगांच्या होळीच आयोजन करण्यात येत आहे.
यामध्ये शहरातील नामवंत डॉक्टर , व्यापारीसह शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थित राहून आनंद लुटला. तर सध्या निवडणुकीचा काळ असल्याने उमेदवाराने सुद्धा ही संधी सोडली नाही. भाजपचे लोकसभेचे उमेदवार अनुप धोत्रे यांनीही या कार्यक्रमात उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी गाण्याच्या तालावर ठेका घेत सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा