crime-news-Akola police-lcb: मोटार सायकल चोरी करणारा आरोपी अटकेत; आरोपीने तीन गुन्ह्याची दिली कबुली




भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला: स्थानिक गुन्हे शाखा अकोला कडून चोरीच्या गुन्हयातील अकोला जिल्हयातील दोन व अमरावती जिल्हयातली एक अशा एकुण ०३ मोटारसायकल किंमत अंदाजे एक लाख सत्तर हजार रूपयांचा मुददेमाल जप्त करून आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.




अकोला जिल्हयात मोटारसायकल चोरीच्या घटनांमधे दिवंसेदिवस वाढ झाल्याने पोलीस अधिक्षक बच्चनसिंह  यांनी मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणनेबाबत आदेशीत केल्याने स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी एक पथक तयार केले. पथकाला  २८ मार्च  रोजी मिळालेल्या गोपनिय माहीतीवरून आरोपी  शरद अशोक सहारे (वय ३० वर्ष, रा. खानापुर वेस, अकोट ता. अकोट, जि. अकोला) यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्याने त्याचे साथीदाराचे मदतीने पोलीस स्टेशन बोरगाव येथील अपराध क्रमांक १६०/२४ आयपीसी कलम ३७९ मधील हिरो कंपनीची सीबी शाईन मोटर सायकल क्र.एम एच ३० बीए ६७७९ किमत अंदाजे ७०,०००/-रूपये तसेच पोलीस स्टेशन मुर्तीजापुर शहर येथील अप. क.८९/२०२४ कलम ३७९ भादवी मधील पॅशन प्रो कंपनीची एक मोटारसायकल  एम एच १४ बी क्यु ७९३२ किं.अं.४०,०००/-रूपये अशा अकोला जिल्हयातील व पोस्टे. पथ्रोट जि. अमरावती ग्रमीणचे हददीतुन चोरी गेलेली ड्रीम युगा कंपनीची एक मोटारसायकल किंमत अंदाजे ६०,०००/-रूपये असा एकुण १,७०,०००/-रूपयांचा मुददेमाल जप्त करून आरोपी पोस्टे. बोरगाव मंजु यांचे ताब्यात देण्यात आले. तसेच आरोपीने साथीदाराच्या मदतीने पो.स्टे. अकोटफैल येथील अप.क्र.६०२/२३ कलम ३७९ भादवी तसेच पो.स्टे. दर्यापुर जि. अमरावती ग्रामीण येथील अप. क.८१/२४ कलम ३७९, ३४ भादवी मधे चोरी गेलेली मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.



कार्यवाही पोलीस अधिक्षक बच्चन सिंह , अपर पोलीस अधिक्षक  अभय डोंगरे , यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला, पो.उप.नि राजेश जवरे, उमेश पराये, फिरोज खान, सुलतान पठाण, रवी खंडारे, महेन्द्र मलीये, गोकुळ चव्हाण,  वसीमोददीन, आकाश मानकर, अभीषेक पाठक व  प्रशांत कमलकार तसेच सदर कार्यवाहीसाठी पो.स्टे. अकोट शहर येथील पो.उपनि. अख्तर शेख, मनिस कुलट, विशाल हिवरे, रवि सदांशिव यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

टिप्पण्या