- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
bye-election-akola- west-obc: अकोला पश्चिम मधून प्रा तुकाराम बिडकर यांना उमेदवारी द्या- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाचे मागणी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला - अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक लागली आहे. या पोट निवडणुकीमध्ये मागील वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता तरी यावेळेस अकोला पश्चिम मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढवावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महानगर अध्यक्ष ओबीसी विभाग अकोला अनिल मालगे यांनी केली आहे.
या मतदार संघातून माजी आमदार विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष तथा सेवा दलाचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रा.तुकाराम बिडकर यांना उमेदवारी द्यावी, असे आम्ही आपणास नम्र विनंती करीत आहोत. या मतदार संघात खूप मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव तथा आपल्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते नगरसेवक आहेत तथा तुकाराम बिडकर यांना मानणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा मतदार संघ लढून प्रा.तुकाराम बिडकर यांना अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी आम्ही करीत आहोत, असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग महानगर अध्यक्ष अनिल मालगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा