amit-shah-visit-akola-vidarbha: अमित शहा यांच्या स्वागताची जय्यत तयारी: राज राजेश्वर नगरीत आठ ठिकाणी होणार स्वागत; विदर्भातील सहा लोकसभा मतदारसंघाचा घेणार आढावा





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: देशाचे गृहमंत्री नामदार अमित शहा यांचे राज राजेश्वर नगरीमध्ये उद्या  मंगळवार 5 मार्च रोजी सकाळी 11 वाजता आगमन होत असून, अकोला शहरात आठ ठिकाणी त्यांचे स्वागत होणार आहे. याठिकाणी अमित शहा हे जनतेचा अभिवादन स्वीकारणार आहे. त्यानंतर सकाळी 11.15 वाजता अमित शहा हे हॉटेल जलसा (बाळापूर रोड) येथे विदर्भातील सहा लोकसभा मतदार संघाचा आढावा घेवून संचालन समिती व लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधणार आहेत.



नामदार अमित शहा यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच वेळेचे महत्त्व लक्षात घेता व दिवसभराच्या कार्यक्रमाची व्याप्ती लक्षात घेता  ते गाडीतूनच जनतेचा अभिवादन स्वीकारतील. तर शहरातील शिवर, शिवणी, नेहरू पार्क, अशोक वाटिका, लक्झरी बस स्टॅन्ड, पत्रकार चौक, वाशिम नाका, बाळापूर नाका याठिकाणी ते स्वागत स्वीकारतील. त्यानंतर हॉटेल जलसा येथे अकोला, बुलढाणा, वाशिम-यवतमाळ, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील संचालन समिती व पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधणार  आहेत. दिवसभरातील कार्यक्रमाची व्याप्ती पाहता नामदार अमित शहा यांचा कार्यक्रममध्ये ही सुधारणा केली आहे. यानुसार कार्यक्रम होणार असून, दुपारी 1.15 वाजता अकोल्यावरून ते जळगाव येथे युवा संमेलनाला संबोधित करण्यासाठी जाणार आहेत. त्यानंतर संभाजीनगर येथे जाहीर सभा व संचालन समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.





यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर, पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, नामदार सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, खासदार अनिल बोंडे, तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, आमदार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.



अकोला जिल्ह्यात खासदार संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनात आमदार रणधीर सावरकर यांच्या योग्य नियोजनात आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, किशोर पाटील, विजय अग्रवाल, जयंत मसने, श्याम बडे, नकुल देशमुख, तेजराव थोरात, अनुप धोत्रे, विजयराव जाधव, नकुल देशमुख, तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत.




अमित शाह हे राज राजेश्वर नगरीमध्ये प्रथमच येत असल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आठ ठिकाणी भव्य दिव्य स्वागत करण्यासाठी भाजपा व भाजपा मित्र पक्ष, महायुतीचे कार्यकर्ते, राष्ट्रभक्त नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर व भाजपा अकोला लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांनी केले आहे.

टिप्पण्या