akola-police-city-crime-2024 : अलंकार मार्केट मधील चोरी करणाऱ्या बुलेट गँग मधील एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात; 17 गुन्हे उघडकीस




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: शहरातील अलंकार मार्केट मधील सात ते आठ दुकानांचे शटर उचलून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या बुलेट गँगमधील एका आरोपीस अटक करण्यात अकोला स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.






या चोरट्यांनी अकोल्यातीलच सात ते आठ दुचाकी चोरी करून याच दुचाकींचा वापर करीत अलंकार मार्केटमध्ये चोरी केली होती. त्यानंतर दोन दुचाकी घेऊन मुद्देमालासह हे चोरटे पसार झाले होते.



या चोरट्यांनी नांदेड, नागपूर, अमरावती,  हिंगोली यासह अनेक जिल्ह्यात चोरी केल्याची कबुली दिली.



अकोला स्थानिक गुन्हे शाखेने अकोल्यातील चोरी प्रकरणी या गँग मधील एका आरोपीला शिर्डी येथून अटक केली. तर उर्वरित 6 आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.



17 गुन्हे उघडकीस


अकोला जिल्हयातील ०६ तसेच इतर जिल्हाचे ११ असे एकुण १७ गुन्हे उघडकीस आणुन स्थानीक गुन्हे शाखा अकोला यांचे कडुन एक आरोपी जेरबंद 


आंतराज्यीय टोळीच्या (शटर गैंगच्या) मदतीने गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार स्थानीक गुन्हे शाखा, अकोला यांचे कडून अटक.


बंद दुकानांचे शटर हाताने उचलून केलेले अकोला जिल्हयातील ०६ गुन्हे उघडकीस


अकोला शहरातील जुने शहर, रामदास पेठ भागातील मोटार सायकल बुलेट चोरी करून एकाच रात्री ७ ते८ शटर उचलून चोरी करणारी अंतर राज्यीय गुन्हेगारांना टिप देणारा महाराष्ट्रातील गुन्हेगार अमरावती जिल्हयातील कापूस तळणी ता. अंजनगाव जि. अमरावती येथील आरोपीस अटक.


अंतरराज्यीय (बुलेट गॅग) शटर उचलून चोरी करणारे अकोला जिल्ह्यातील घटनेतील आरोपींचे नावे निष्पन्न


अकोला जिल्हयासह अमरावती (शहर), नागपूर ग्रामीण, वाशीम, हिंगोली, जिल्हयातील बंद दुकाणाचे शटर उचलून चोरी केल्याचे अनेक गुन्हे उघड.


दिनांक २९/०२/२०२४ रोजी सकाळी अकोला शहरातील अलंकार मार्केट येथील ७ ते ८ बंद दुकाणाचे शटर उचलून चोरी केल्याची खळबळजनक प्रकार समोर आला होता. घटने दरम्यान ०५ संशयीतांनी शहरातील ७ मोटार सायकली चोरी करून ५ मोटार सायकली सोडून देवून, ०७ ते ०८ बंद दकाणाचे शटर उचलून चोरी करून दोन बुलेट मोटार सायकल घेवून फरार झाले होते. या घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक, अकोला  बच्चन सिंह यांनी स्थागुशा प्रमुख  शंकर शेळके यांनी एक पथक गठीत करून आरोपीत लोकांना निष्पन्न करून गुन्हे उघडकीस आनण्या बाबत सुचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे स्थानीक गुन्हे शाखा, अकोला पथकातील पो. हवा. फिरोज खान, अब्दुल माजीद, खुशाल नेमाडे, महेंद्र मलिये, पो. अं. वसीमोद्दीन, आकाश मानकर, अभिषेक पाठक, धिरज वानखडे चालक पो. हवा. प्रशांत कमलाकर यांनी सतत ०९ दिवस अथक परिश्रम घेवून ०५ संशयीतांचा अहमदनगर जिल्ह्या पर्यंत माग काढून चोरलेली बुलेट मोटारसायकल जप्त केली होती. तेव्हा पासून आजपर्यंत  संशयीत ०५ आरोपी बाबत बाहेर जिल्हयात व आंतरराज्यात अश्या प्रकारे गुन्हे करण्याची पध्दत असलेल्या संशयीतांची माहीती संकलीत करून त्यांचे मागावर होते. तांत्रिक विश्लेषना नंतर हैद्राबाद येथील एक ईसम हा संशयीत गैंगचे सोबत अमरावती येथून संपर्कात असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पथकाने अमरावती (ग्रामीण) स्थागुशा यांचे मदतीने संशयीत ईसम  फरहान अहेमद अब्दुल गफार (वय ३० वर्ष व्यवसाय ड्रायव्हर, रा. चंद्रगुट्टा हैद्राबाद ह.मु ग्राम कापूस तळणी ता. अंजनगाव जि. अमरावती.) यास ताब्यात घेवून विचापूस केली असता, त्याने गुन्हा केल्याचे कबुल केली असून त्याचे पासून पो. स्टे अकोट फाईल येथील गुन्हयात वापरलेली मोटार सायकल आणि नगदी रक्कमे पैकी त्याचे हिश्यावर आलेले नगदी आणि मोबाईल असा एकुण १,१२,५००/-रू जप्त करण्यात आला आहे. तसेच अकोला जिल्हयातील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असलेला रेकी करून टिप दिलेले अश्या स्वरूपातील सोबत्यासह गुन्हे केल्याची कबुली दिली.


दिनांक २९/०२/२०२४ रोजी पो. स्टे रामदास पेठ, आणि  जुने शहर हद्दीत चोरी करणाऱ्या आरोपीतांची नावे ताब्यातील आरोपी फरहान अहेमद अब्दुल गफार यांचे कडून निष्पन्न झाले असून सदर आरोपी हे कर्नाटक, तेलंगाणा, आंध्रप्रदेश या राज्यातील असून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल.


तसेच ताब्यातील आरोपी याने त्योच साथीदारासह महाराष्ट्रात इतर जिल्हयातील ११ बंद दुकानाचे शटर उचलून चोरी केली आहे. तसेच ईतर जिल्हयात सुध्दा चोरी केल्याचे संशय आहे.



सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक  बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक  अभय डोंगरे , पो.नि. शंकर शेळके स्थागुशा अकोला यांचे मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखा अकोलाचे पो.उपनि. गोपाल जाधव, राजेश जवरे, पो. हवा. फिरोज खान, अब्दुल माजीद, खुशाल नेमाडे, महेंद्र मलिये, पो. अं वसीमोद्‌दीन, आकाश मानकर, अभिषेक पाठक, धिरज वानखडे , प्रशांत कमलाकर, अक्षय बोबडे राहुल गायकवाड, रविंद्र खंडारे अविनाश पाचपोर, एजाज अहेमद विशाल मोरे प्रमोद डाईफोडे, सुलतान पठाण, उमेश पराये, गोकुळ बढ़ाण, सतीष पवार, स्वप्नील खेडकर, शेख अन्सार, मो. अमीर, स्वप्नील चौधरी तसेख सायबर पो. स्टे से आशिष आमले, राहुल सानप, गोपाल ठोंबरे यांनी केली आहे. सदर कार्यवाही मध्ये अमरावती ग्रामीण स्यागुता से पो. नि  किरण वानखडे आणि टिम यांनी आरोपीस अटक करण्यास मदत केली आहे.



टिप्पण्या