- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला : मागीलवर्षी एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या 11 सप्टेंबरला झालेल्या बैठकीत मान्य करून, एस टी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीची वाढीव दराची थकबाकी देण्याबाबत १५ दिवसात मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांच्या उपस्थितीत मान्यता प्राप्त कामगार संघटने समवेत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे मान्य केलेले होते. परंतु ४ महिन्यांचा कालावधी संपूनही अद्याप अशी बैठक झालेली नाही.
यासह सर्व प्रलंबित आर्थिक मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यासह अकोल्यातही संघटनेने पुन्हा १३ फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषणाला सुरूवात केली. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलन दरमान्य मागण्या पूर्ण न झाल्यास आता एस टी कर्मचारी पुन्हा ' स्टेरिंग छोडो ' आंदोलनाच्या पवित्रा घेणार असल्याचं चिन्ह दिसून येत आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा