Rajendra-Patni-passed-away: भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन; देवेंद्र फडणवीस यांनी वाहीली श्रद्धांजली




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचे दीर्घ आजारामुळे आज निधन झाले. 



५९ वर्षीय राजेंद्र पाटणी हे हृदयाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. मात्र, आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. 



राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटर (X) वरून राजेंद्र पाटणी यांना श्रद्धांजली वाहिली. 

सौजन्य: ट्विटर (X)


विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीजी यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली.

ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला आहे. पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे. त्यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे.

मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबीयांना मिळावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो,असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.



टिप्पण्या