akola-bar-association election 2024: ॲड. हेमसिंह मोहता व ॲड. नरेंद्र बेलसरे यांचा दणदणीत विजय





महिला उपाध्यक्ष ॲड. शितल राऊत तर सह सचिवपदी ॲड. दुष्यंत धोत्रे 





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोला बार असोसिएशनची सर्वसाधारण निवडणूक 2024 शुक्रवार 9 फेब्रुवारी रोजी जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात पार पडली. निवडणुकीमध्ये 881 वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत निवडणूक प्रक्रिया चालली. अध्यक्ष पदाकरिता दोन उमेदवार रिंगणात उभे होते. एडवोकेट संतोष गोळे आणि एडवोकेट हेमसिंह मोहता यांच्या थेट रंगत रंगली. एडवोकेट संतोष गोळे यांनी 311 तर एडवोकेट हेमसिंग मोहता यांनी 561 मते मिळवली. यामध्ये तब्बल अडीचशे मतांनी एडवोकेट हेमसिंह मोहता यांनी आघाडी घेत विजयश्री खेचून आणली. यामध्ये नऊ मते अवैध ठरली.




पुरुष उपाध्यक्ष पदाकरिता चार उमेदवार रिंगणात होते. एडवोकेट नरेंद्र बेलसरे यांनी 336 मत घेऊन विजय मिळविला. दुसऱ्या स्थानावर एडवोकेट राहुल वानखडे यांनी 238 मते मिळविले. 98 मतांची आघाडी घेत एडवोकेट बेलसरे विजयी ठरले. एडवोकेट पठाण अन्वर अहमद खान यांनी 61 मत तर ॲडव्होकेट संतोष वाघमारे यांनी 236 मते मिळवले. दहा मते यामध्ये अवैध ठरले.





महिला उपाध्यक्ष पदाकरिता एडवोकेट सुनिता कपिले आणि एडवोकेट शितल राऊत यांच्यात काट्याची लढत झाली. एडवोकेट कपिले यांनी 414 तर एडवोकेट राऊत यांनी 456 मते मिळविले. 42 मतांची आघाडी घेत एडवोकेट राऊत विजय ठरल्या. यामध्ये नऊ मते अवैध ठरले.




सहसचिव पदी पदाकरिता चार उमेदवार रिंगणात होते. एडवोकेट कैलास अनमाने यांना 36, एडवोकेट दुष्यंत धोत्रे यांना 523, एडवोकेट सुमित डोंगरदिवे यांना 200 तर एडवोकेट सौरभ तेलगोटे यांना 26 मते प्राप्त झाली. 244 मतांची आघाडी घेत एडवोकेट दुष्यंत धोत्रे यांनी विजय मिळविला. यामध्ये 17 मध्ये अवैध ठरली.




निवडणूक अधिकारी म्हणून एडवोकेट सत्यनारायण जोशी यांनी काम पाहिले. त्यांना एडवोकेट ए. जे. ठाकूर, एडवोकेट मोहम्मद परवेज डोकडिया, एडवोकेट रविकांत ठाकरे, एडवोकेट राजेश अकोटकर, एडवोकेट देशमुख ॲड. विनय यावलकर, एडवोकेट धीरज शुक्ला, रवी श्रीवास्तव आदींनी सहकार्य केले.




निवडणूक निकाल घोषित होताच विजयी उमेदवारांचे सहकारी मित्रांनी जल्लोष केला. परिसरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली.


विजयी उमेदवार अध्यक्ष ॲड. हेमसिंह मोहता यांचे वडील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. मोतिसिंह मोहता यांचे अभिनंदन करताना ॲड. अजित देशमुख.



   file image 

सर्व विजयी उमेदवारांचे भारतीय अलंकार न्यूज 24 तर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

मुख्य संपादक

ॲड. नीलिमा शिंगणे - जगड 

टिप्पण्या