innovative-movement-jijau- jayanti: जिजाऊ जयंती निमित्ताने जिजाऊ सभागृहाचे दुरावस्था विरोधात ‘वंचित’ चे अभिनव आंदोलन; सभागृहात सफाई आणि शहरात स्वाक्षरी अभियान






भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : शहरातील एकमेव राजमाता जिजाऊ सभागृहाची दयनीय अवस्था पाहता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने आज  जिजाऊ सभागृहाचे परिसरात सफाई अभियान प्रा. अंजली आंबेडकर आणि युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात राबविण्यात आले. तसेच शहरातील 21 प्रमूख चौकात एकाचं वेळी स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. 




सकाळी ८ वाजता जिजाऊ जयंती निमित्ताने राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना वंदन करुन सफाई अभियान सुरू करण्यात आले. अभियानात प्रा. अंजली आंबेडकर तसेच युवा नेते सुजात आंबेडकर यांनी स्वत: परिसराची सफाई केली.




त्याच वेळी शहरातील इन्कम टॅक्स, तुकाराम चौक, कोलखेड चौक, सिंधी कॅम्प, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान, डाबकी रोड, गांधी चौक, टॉवर चौक, सिविल लाईन्स चौक मोठी उमरी चौक अण्णाभाऊ साठे रेल्वे स्टेशन चौक, हनुमान चौक, जठारपेठ चौक, शिवाजी पार्क चौक, जवाहर नगर चौक, शिवनी चौक रतनलाल प्लॉट चौक, महाकाली चौक, नेहरू पार्क, शिवर चौक या ठिकाणी स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. याच 21 मंडपामध्ये मध्ये जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली.


तर जनतेकडून पाच पाच रुपये गोळा करणार- प्रा. अंजली आंबेडकर 


दरम्यान १९ फेब्रुवारी पर्यंत जिजाऊ सभागृहाचे नूतनीकरण न झाल्यास, शहरात रथ यात्रा काढून जनते कडून पाच - पाच रुपये गोळा करून सभागृहाचे काम पूर्ण करण्याचा इशारा यावेळी प्रा. अंजली आंबेडकर यांनी दिला.




कार्यकारी अभियंता दिशाभूल करीत असल्याने ठिय्या आंदोलन



सभागृह दुरावस्था विरुद्ध स्वाक्षरी मोहिमेतील सह्यांचे अर्ज सादर करण्यास व चर्चा करण्यास निवासी उपजिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता ह्यांचे सोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र कार्यकारी अभियंता दिशाभूल करीत असल्याने संतप्त पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आर डी सी यांचे दालनात ठिय्या मांडला. प्रचंड घोषणा देण्यात आल्या आणि कार्यकारी अभियंता व विभागीय अभियंता यांचेकडे लोकवर्गणी मागणी करीत महिलानी पदर पसरले. अधिकारी दाद देत नसल्याने त्यांचे अंगावरून ५ - ५ रुपये ओवाळून सभागृहाचा निधी गोळा करायला सुरुवात झाली.आणि स्वक्षरीचे गठ्ठे त्यांना सोपविण्यात आले.

 



वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर, युवा नेते सूजात आंबेडकर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धन पुंडकर, युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, पश्चिम विदर्भ महासचिव बालमुकुंद भिरड, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महीला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, युवा जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, शोभा शेळके,जि प अध्यक्ष संगीता अढाऊ, आम्रपाली खंडारे (जि प सभापती),रिझवाना परविन (जि प सभापती),माया नाईक (जि प सभापती),पुर्व महानगर अध्यक्ष शंकर इंगळे,पश्चिम कार्याध्यक्ष मजहर खान,जि प सदस्य पुष्पा इंगळे,महानगर अध्यक्ष कलीमखान पठाण,महासचिव गजानन गवई, महीला अध्यक्ष वंदना वासनिक, दादाराव पवार, ज्ञानेश्वर सुलताने, दामोदर जगताप, प्रतिभा अवचार, दिपक गवई, आकाश शिरसाट, सुरेश शिरसाट, आनंद खंडारे, शाहीद खान, किशोर जामनिक, प्रशिक मोरे, विकास सदांशिव, नितीन सपकाळ,अमर डिकाव, गजानन दांडगे,मधु गोपनारायण, आतिश शिरसाट, शंकर इंगोले, गोपाल चव्हाण, गोरशिंग राठोड, संजय किर्तक, सचिन शिराळे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या