Akola crime: पोलीसांवर हल्ले करणा-यांची आता खैर नाही; पोलीसांच्या गाडीवर फायर करणारे पाच आरोपी जेरबंद





ठळक मुद्दे 

*पोलीस अधीक्षक यांचे भेटीनंतर १८ तास राबवीली जम्बो शोध मोहीम.

*रात्रभरात शेगाव, हातरून, बखेगाव, नेर धामना, वाशिम जिल्हयातील रिसोड येथून असे एकुण ०५ आरोपी ताब्यात.

*गुन्हयात वापरलेल्या मोटार सायकली व बंदूक जप्त 

*शिकारीच्या उद्‌देशाने फिरत असलेले आरोपी पोलीस गाड़ी पाठलाग करीत असल्याचे आणि आपण पकडले जाणार या भितीने एका आरोपीने केला पोलीस गाडीवर फायर.



भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड

अकोला: पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या 5 आरोपींना अकोला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. 30 डिसेंबर रोजी 

अकोला जिल्ह्यातील माजरी ते कंचनपूर या मार्गावर पोलिसांच्या पेट्रोलिंग दरम्यान काही आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला होता.या गोळीबार करणाऱ्या पाचही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. हे सर्व आरोपी 19 ते 26 वयोगटातील असून आरोपींकडून दोन दुचाकी आणि एक बंदुक जप्त करण्यात आली आहे.

आरोपी हे हरीण व रानडुकरांच्या शिकराच्या उद्देशाने रात्री फिरत असतांना पोलिसांची गाडी दिसल्याने गोळीबार केला आहे. या आरोपींना अटक करण्याचं मोठं आव्हान अकोला पोलिसां समोर होते. याकरिता या आरोपींची माहिती देणाऱ्यांना 25 हजारांच बक्षीस सुद्धा ठेवण्यात आलं होतं. आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिली.



रविवारी सकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात निमंत्रित पत्रकार परिषदेत बच्चन सिंह यांनी यासंदर्भात माहिती दिली.



दिनांक ३० डिसेंबर २०२३ रोजी पोलीस स्टेशन उरळ हद्दीतील रात्रगस्त करणारे अधिकारी हे त्यांचे सहकारी सोबत कर्तव्य बजावीत असतांना रात्री ३ वाजताच्या सुमारास ग्राम मांजरी वरून हातरुण कडे जात असतांना पोलीस गस्त वाहनाला दोन मोटार सायकलीवर चार संशयीत इसम दुरूनच येतांना दिसून आल्याने, त्यांनी आपली शासकीय वाहन थांबवून येणा-या मोटार सायकल चालकाना थांबविण्याचा इशारा केला. मात्र त्यांना समोर पोलीस असल्याची चाहुल लागल्याने त्यांनी आपआपली मोटार सायकली वळवून पळून जाण्याच्या उद्देशाने वळविल्या. पोलिसांना त्यांच्यावर संशय आल्याने  क्षणाचाही विलंब न करता त्याचा पाठलाग केला. पोलीस त्यांना पकडणार तेवढ्‌यात मोटार सायकल स्वार याचे मागे बसलेल्या इसमाने पोलीसांच्या गाडीचे काचवर अग्निशस्त्र ने फायर केला. गाडीचा काच फुटला. पोलीस गाडीतील चालकचे डोळ्याला ईजा झाली.  याचा फायदा घेवून आरोपी पसार झाले होते. या गुन्ह्यात  आरोपीतांना पोलीसांना जिवे मारण्याच्या उद्देशाने अग्निशस्त्राचा वापर करून फायर केल्याचे तपासा दरम्यान निष्पन्न झाल्याने कलम ३०७ भा.दं.वि वाढविण्यात येत आहे, असे बच्चन सिंह यांनी सांगितले.


पोलीसांच्या समोर होते मोठे आव्हान 

जिल्हयात प्रथमच पोलीसांचे गाडीवर झालेल्या गोळीबाराचे घटनेचे जिल्हयात तसेच राज्याच पडसाद उमटून विविध चर्चांना उधाण असता, गुन्हेगारांना जेरबंद करणे जिल्हा पोलीसांना आव्हान ठरले होते. घटना घडल्या पासून स्थानिक गुन्हे शाखा यांचे एक पथक हे पो.स्टे. उरळ व परिसरात गोपनिय माहीती संकलीत करीत होते. नवनियुक्त पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून घटनेच्या ठिकाणी  १३ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वा भेट देवून गोळीबार झालेल्या ठिकाणी अधिकारी आणि अमलदार यांना सुचना देवून आरोपी निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणण्या बाबत आदेशीत केले. तसेच सदर गोळीबार करणा-या घटनेची माहीती जो कोणी देणार त्यास २५,०००/-रु बक्षीस जाहीर केले होते. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिलेल्या सुचना प्रमाणे पोलीस निरिक्षक शंकर शेळके यांनी आतापर्यंत केलेल्या तपासाचा व स्थानीक गुन्हे शाखाकडे प्राप्त झालेल्या गोपनिय माहीती या खातरजमा करून याच वेळेपासून कार्यवाही सुरू केली. यात ०४ अधिकारी आणि २८ अमलदार यांनी सहभाग घेतला. रात्री १० वाजता सुरू झालेली शोध मोहीम दरम्यान ग्राम हातरुण, नखेगाव, नेर धामणा, शेगाव, वाशिम जिल्हयातील रिसोड येथून गुन्हा करणारे आरोपी अश्विन गणेश मुंडे वय २१ वर्ष रा. ग्राम नखेगाव, भावेश उर्फ अर्जुन रविंद्र मुंडाले वय १९ वर्ष रा. ग्राम नखेगाव. ह.मु हालसन विटाचे भट्‌यावर, सागर ज्ञानेश्वर चीके वय २५ वर्ष रा. ग्राम नेर धामना, अविनाश भिमराव मुंडाळे वय २६ वर्ष रा.ग्राम नखेगाव, योगेश रामराव मुंडाळे वय २६ वर्ष यांना ताब्यात घेवून पोलिसी खाक्या दाखविताच आरोपींनी घडलेला घटनाक्रम सांगून गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी हे नेहमीच त्या परिसरात शिकारी करीता फिरत असल्याची दबक्या आवाजात गावकऱ्यांमध्ये चर्चा होती. अप. न. ४३२/२३ कलम ३५३,३३६,३४ भा दं वि,आर्म ऍक्ट ३/२५ नुसार गुन्हे दाखल केले होते. यात आता कलम ३०७ जोडण्यात येणार आहे.


कारवाई ही  पोलीस अधीक्षक अकोला  बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोगरे , सहा. पोलीस अधीक्षक गोकुळ राज यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके , सपोनि  कैलास भगत, पोउपनि, गोपाल जाधव, अमलदार भास्कर धोत्रे, रविंद्र खंडारे, सुलतान पठान, महेंद्र मलिये, अब्दुल माजीद, अविनाश पाचपोर, एजाज अहमद, वासिमोद्दिन शेख, विशाल मोरे, भिमराव दिपके, स्वप्नील खेडकर, सतीष पवार, चालक नफीज शेख, अक्षय बोबडे, प्रविण कश्यप,  सायबर सेलचे आशिष आमले तसेच नखेगाव व नेर गाव हे पो. स्टे दहीहांडा हद्‌दीत येत असल्याने तेथील ठाणेदार योगेश वाघमारे व ०८ अमलदार यांचे सहकार्य लाभले.



टिप्पण्या