akola-crime-news-nylon-manja: नायलॉन मांज्याची विक्री करणारे दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 


अकोला: लोकांच्या जिवावर उठलेल्या नायलॉन मांज्याची विक्री करणा-या आरोपी विरूध्द स्थानिक गुन्हे शाखा, अकोलाने धडक कारवाई करून दोन आरोपी ताब्यात घेतले. आरोपीं कडून एकुण ३३,६००/- रू. चा मुददेमाल पोलिसांनी जप्त केला आहे.


देशात मकर संक्रातीचा सण जवळ आला असुन, त्या पार्श्वभुमीवर संपुर्ण देशात पंतग उडविण्याची प्रथा आहे. राज्यात व देशात नायलॉन मांज्याने पंतग उडवील्यामुळे बरेच इसम गंभीर जखमी होवुन काही पक्षी प्राण्यांचा व इसमांचा मृत्यु झाला आहे. तसेच बरेच पक्षी व प्राणीसुध्दा जखमी झालेले आहे. त्यामुळे राज्य शासनाने सदर नॉयलॉन मांज्याच्या वापरास प्रतीबंध केला आहे. तरी सुद्धा काही इसम नायलॉन मांजाची अनाधिकृत विक्री करीत आहेत. त्यामुळे  पोलीस अधिक्षक अकोला यांनी जिल्हयाभरात नायलॉन मांजा विक्री करणा-या इसमांविरूध्द कारवाई करण्याचे आदेश दिले. यानुसार पो. नि. शंकर शेळके स्था.गु.शा, अकोला यांचे अधिनस्त अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून त्यांना चायनिज / नायलॉन मांजा विक्री करणा-या इसमांविरूध्द कारवाई करण्याची सुचना दिली असता पथकाने अकोला शहरात दोन ठिकाणी चायनिज मांजा विक्री करणारे इसम शहबाज खान इनायत खान (वय २६ वर्ष रा. अतार गल्ली, तेली पुरा, अकोला) व  शेख आबीद शेख रउफ (वय २४ वर्ष रा. कादर अपार्टमेंट, कांगरपुरा, अकोला) यांचे विरूध्द कारवाई करून त्यांचेपासुन प्रतिबंधीत नायलॉन मांजा एकुण २४ बंडल (रील) किंमत अं. ९,६००/- रू. व दोन मोबाईल किंमत अं.२४,०००/- असा एकुण ३३,६००/- चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला. 



दोन्ही आरोपी विरूध्द पोलिसांनी गुन्हा नोंद करून त्यांना पुढील तपास कामी पोलीस स्टेशन रामदास पेठ, अकोला यांचे ताब्यात येत आहे.


ही कार्यवाही पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक  अभय डोंगरे , पो.नि. शंकर शेळके, स्थागुशा यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. कैलास भगत, पो.उपनि. गोपाल जाधव, पोहेकॉ. सुलतान पठाण, रविंद्र खंडारे, नापोकॉ. अविनाश पाचपोर, वसिमोदिदन शेख, विशाल मोरे, पोलीस अंमलदार, ऐजाज अहमद व भिमराव दिपके यांनी केली आहे.

टिप्पण्या