pushpendra-kulshresth-akola: पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे अकोल्यात राष्ट्रिय संबोधन; राष्ट्र जागृती मंच व्दारा कार्यक्रमाचे आयोजन





भारतीय अलंकार 24

ॲड.नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: राष्ट्रप्रेमी जागरूक नागरिकांसाठी तसेच राष्ट्रभक्ती आणि सनातन संस्कृती संवर्धनाच्या उद्देशाने राष्ट्र जागृती मंचच्या वतीने निर्भीड वक्ता पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या राष्ट्रीय व्याख्यानाचे अकोल्यात आयोजन करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्र जागृती मंचचे संयोजक नवल टावरी यांनी दिली.


आर्य समाज सभागृह गांधी मार्ग येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.




पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ हे संपूर्ण भारतभर राष्ट्र चेतना जागृत करत असून ते भारतीय इतिहासाची गूढ माहिती देणार आहेत अकोल्यात 25 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता मुंगीलाल मैदानात प्रबोधन करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रवेश निःशुल्क आहे. अकोल्यातील  नागरीकांनी या राष्ट्रिय कार्यक्रमात  भगवा पट्टी, दुपट्टा घालून उपस्थित रहावे, असे आवाहन टावरी यांनी केले.  





सनातन धर्माबद्दल सांगताना संयोजक नवल टावरे पुढे म्हणाले की,जवळपास 2 अरब वर्षा पूर्वी, ज्याक्षणी या पृथ्वी तलावर प्रथम सुर्य किरण पडले, सोबतच वेदांच्या माध्यमातून सत्य विद्या व आध्यात्मिक तत्वज्ञान अवतरित झाले, त्याच क्षणी सनातन धर्म संस्कृती सोबत भगवा ध्वज जन्माला आला.

सनातन वैदिक संस्कृतीचे संरक्षक अव्दितीय राष्ट्रपुरूष श्रीराम व श्रीकृष्ण आणि प्राचिन ऋषिमुनींची परम पावन, अनुपम जन्मस्थळी पाश्चात्य विकृति तथा अधर्मि लुटारू, आक्रमण कर्त्यांनी कित्तेक वेळ आक्रमण केले आणि आपली धन संपदा, बाहूबल, धुर्तता तथा स्वार्थी लेखकांच्या मानसिकते मुळे भारताचा इतिहास व सत्य सनातन संस्कृतिचे अत्यंत विद्रुप विकृतिकरण करण्यात आले. 



 



पत्रकार परिषदेला राष्ट्र जागृती मंचचे संयोजक नवल टावरी, रत्नदीप गणोजे, राहुल पवार, पंकज टावरी, विमल जैन, संजय ठाकूर, सुरेश काबरा, नंदकिशोर आवारे, श्रीकांत पंडित, हरीश भाला ,राजेश भाला, राम भिरड आदी मान्यवर उपास्थित होते.




टिप्पण्या