political-prakash-ambedkar: शासनकर्ते आणि विरोधकांमध्ये कॉम्प्रमाईज झालं आहे - प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य



ठळक मुद्दे

*ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रा. अंजली आंबेडकर यांच्याशी संवाद जिव्हाळ्याचा 


*राम जाधव यांच्या स्मृती प्रित्यर्थ नाट्यतपस्वी पुरस्कार वितरण सोहळा 



भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : संविधान धोक्यात आले असून शासनकर्ते आणि विरोधक दोघांपासूनही आपण समाधानी नाही. कारण दोघांमध्ये कॉम्प्रमाईज झालं आहे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.


बुधवारी अकोल्यात ज्येष्ठ रंगकर्मी राम जाधव यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित कार्यक्रम निम्मित ॲड. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी सुविद्य पत्नी प्रा. अंजली आंबेडकर यांची प्रकट मुलाखत आयोजकांच्या वतीने संवाद जिव्हाळ्याचा या टॅग लाईन खाली घेण्यात आली. यावेळी आंबेडकर दाम्पत्यानी राजकीय, सामाजिक क्षेत्रासह वैयक्तिक जीवनाबद्दल अनेक खुलासे केले आहे. दोघांनीही आपल्या जीवन प्रवास संदर्भात अनेक गोष्टींना उजाळा दिला.





यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी राम जाधव यांच्या नावे देण्यात येणारा नाट्यतपस्वी पुरस्कार वर्ध्याचे कलावंत हरीश इथापे यांना प्रदान करण्यात आला.




आंबेडकर यांनी आपल्या मुलाखतीत समाजाने दृष्टिकोन बदलावा आणि आपण सर्व सामान्य माणसा सारखं जगावं तरच तुम्ही आनंदाने जगू शकता असा जीवनाचा मूलमंत्र उपस्थितांना दिला.




डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महात्मा ज्योतिबा फुले , गौतम बुद्ध आणि तिसरे गुरू कबीर होते, याचा ही खुलासा ॲड. आंबेडकर यांनी यावेळी केला..




नरेंद्र दाभोळकर , गोविंद पानसरे, गौरी लंकेश यांच्यावर झालेल्या हल्ल्या नंतर भीती वाटत होती, असे एका प्रश्नाच्या उत्तरात अंजलीताई आंबेडकर यांनी सांगितले. मात्र अंगरक्षक नको कारण माझ्यावर हल्ला म्हणजे अंगरक्षकावर हल्ला. अंगरक्षकालही त्याचं कुटुंब असतं, अस म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी सुरक्षा नाकारली असल्याचंही अंजलीताई म्हणाल्या.





वैयक्तिक जीवन बद्दल बोलतांना प्रकाश आंबेडकर अभिनेत्री शर्मिला टागोरचे फॅन असल्याची ते बोलले. तर लग्न मित्रांनी जुळवून दिलेले. मात्र प्रेम व्यक्त झाल्यानंतर भेटायचं कुठं असा प्रश्न सामोर असायचा. प्रकाश आंबेडकर जेव्हा मुंबईला जात होते तेव्हा ते फोन करायचे आणि आम्ही चार-पाच स्टेशन एकत्र प्रवास करायचो, अश्या आठवणी अंजली आंबेडकर यांनी सांगितल्या. आमचे भांडण होतात. वडील आणि मुलगा म्हणून सुजात सोबतही भांडण होतात. मात्र हे भांडण फक्त अर्धा तसा पुरते असतात, असे  अंजलीताई यांनी म्हणताच कार्यक्रमात हास्याचे फवारे उडाले.



टिप्पण्या