- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
national-shooting-competition: ६६ व्या राष्ट्रीय शुटींग स्पर्धेत अकोलाचे खेळाडूंची चमकदार कामगिरी; १६ खेळाडू रेनॉन शुटर; चार खेळाडूंचा भारतीय संघाच्या पात्रता फेरीत प्रवेश
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला: राष्ट्रीय रायफल असोसिएशन (NRAI) नवी दिल्ली यांचे विद्यमाने २० नोव्हेंबर ते ०४ डिसेंबर कालावधीत आयोजित ६६ व्या राष्ट्रीय शुटिंग स्पर्धा दिल्ली व भोपाळ येथे संपन्न झाल्या. त्यामध्ये श्री छत्रपती शिवाजी शुटिंग रेंज अकोल्याचे मुख्य प्रशिक्षक विन्सेंट अमेर यांचे मार्गदर्शनात १६ खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून आपले कौशल्य सिद्ध केले.
यामध्ये रायफल प्रकारात
ऋचा गजानन खरात , श्रुती गणेश बडे, सानिका ओमप्रकाश वाडेकर, जान्हवी जगदीश मेश्राम, आदित्य सावरकर, आदित्य अनंत शेळके, चिन्मय चंद्रकांत चव्हाण, सक्षम अनंत हेडा, मोहीत लांडे, सागर चव्हाण, युवराज उके, गजानन वाघ, दिपाली रंधे पिस्टल प्रकारात आकांक्षा अमोल गुंजाळ, शरयू प्रकाश चतरकर, अल्विन मनू राजन,
आदी १६ खेळाडूं सहभागी होऊन चमकदार कामगिरी केली हे सर्व खेळाडू रेनॉन शुटर झाले आहेत.
चार खेळाडू भारतीय संघाच्या पात्रता फेरीत
यापैकी पिस्टल प्रकारात शरयू प्रकाश चतरकर ही भारतीय संघाच्या पात्रता फेरीत, यूथ व ज्यूनिअर या दोन्ही गटात दाखल झाली आहे. ती मागील वर्षीच रेनाॅन शुटर झाली होती तसेच आकांक्षा अमोल गुंजाळ ही सुद्धा यूथ गटात भारतीय संघाच्या पात्रता फेरीत दाखल झाली आहे. रायफल प्रकारात ऋचा खरात व दिपाली रंधे यासुद्धा भारतीय संघाच्या पात्रता फेरीत दाखल झाल्या आहेत.
खेळाडूंच्या या नेत्रदीपक यशामधे श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांचे मोलाचे सहकार्य आहे. खेळाडूंच्या उज्ज्वल यशासाठी संस्थेचे मार्गदर्शक विलासराव हरणे हे खेळाडूंच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे असतात.
खेळाडूंच्या या यशाबद्दल प्रशिक्षक नवनाथ उबाळे, शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय ठोकळ, क्रीडा शिक्षक प्रशांत पावडे, मिलिंद लांडे , शिवाजी इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका वैशाली शेळके,अंकुश डोंगरे, अक्षय यन्नावार, मायकल अमेर, करण चिमा, प्रकाश चतरकर, संध्या काळमेघ, एजाज अहमद, अनिल जाधव, मोहम्मद अतहर, वैजनाथ कोरकने, राधिका बढे, अंकुश गंगाखेडकर, मंगेश लाहेकर, देवेंद्र वाकचवरे, श्याम कुलट , मोहीत लांडे, प्रथमेश राऊत यांनी खेळाडूंचे कौतुक केले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा