Maratha reservation: मराठ्यांनी मनावर घेतले तर कुणालाही सोडणार नाही- मनोज जरांगे






भारतीय अलंकार न्यूज,24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: आरक्षणाअभावी मराठ्यांच्या पोरांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. मराठ्यांच्या जिवावरच तुम्हाला हा ऐषआराम मिळाला. मराठ्यांनी मनावर घेतले तर कुणालाही सोडणार नाही. दोन तारखेला उपोषण सोडताना लिहून घेतलेले आहे. त्यात बदल झाला, तर मग तुमचे अवघड आहे, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी सरकारला देत, ज्या जातींना आरक्षण मिळाले, त्यांनी आरक्षण नसलेल्या गरिबांना बहाणे सांगू नये. त्यांचा तळतळाट लावून घेऊ नका. २४ डिसेंबरला सरसकट आरक्षण न दिल्यास तुम्हाला जड जाईल, हे सरकारनेही लक्षात घ्यावे. विरोधात जाणाऱ्यांना आम्ही कधीही सोडणार नाही, अशी चेतावणी मनोज जरांगे यांनी दिली. अकोला जिल्ह्यातील चरणगाव येथे मंगळवारी आयोजित सभेत ते बोलत होते.



या वेळी मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर विविध प्रकारचे दाखले देत टीकास्त्र सोडले. तसेच गिरीश महाजन यांच्यावरही ताशेरे ओढले. गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणतील,असे जरांगे यांनी म्हणाले.






आता आरक्षण नसलेल्यांना ते मिळवून देण्यासाठी तुम्ही पाठीशी उभे राहायला हवे, हे आवाहन करण्यासाठी विदर्भ, खान्देशात फिरत आहे. येथे आल्यापासून ओबीसीत ज्या छोट्याछोट्या जाती आहेत, त्यांना लाभ मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे असल्याचे सांगत आहेत. तर मराठ्यांची मुले मोठी व्हायला नकोत, असे काहींना वाटत आहे,असे जरांगे म्हणाले.



अंतरवालीसह महाराष्ट्रात दाखल झालेले गुन्हे अद्याप मागे घेतलेले नाहीत. कोणाला अटक करणार नाही, असे आश्वासन दिलेले असताना लोकांना अटक केली जात आहे. कोणाच्या दबावाखाली येऊन शासनाने २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण दिले नाही तर कोट्यवधी मराठे मुंबईत धडकतील आणि शांततेचे हे आंदोलन तुम्हाला जड जाईल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी अंतरवाली सराटी येथे १७ डिसेंबर रोजी बैठक होणार असल्याचेही ते म्हणाले.




आता आम्ही दंड आणि मांड्या थोपटल्या आहेत. लेकरांच्या न्यायासाठी कोणत्याही टोकाला जाऊ. मुंबईत येऊ; परंतु उग्र आंदोलन करणार नाही आणि शांततेचे आंदोलन तुम्हाला पेलणार नाही. आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आले असून, ३२ लाख मराठ्यांच्या घरात प्रमाणपत्र गेले आहे. त्यामुळे कोणीही उग्र आंदोलन करू नये,असे आवाहन जरांगे यांनी केले.


अंतरवाली सराटीसह महाराष्ट्रात दाखल झालेले गुन्हे का मागे घेतले नाहीत, कोणालाही अटक करणार नाही, असे आश्वासन दिलेले असताना आमच्या लोकांना अटक का केली. आमच्यावर हल्ला करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना का रुजू केले, या प्रश्नांची उत्तरे शासनाने द्यावीत, अशी मागणीही जरांगे-पाटील यांनी सभेत केली.






जेसिबीच्या साहाय्याने फुलांची उधळण


मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच चौथ्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात झाली असून, अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चरणगांव येथे मंगळवारी सकाळी त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली.जिल्ह्यातील बाळापूर , वाडेगाव आणि चरणगांव येथे जरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत करण्यात आल. जेसिबीच्या साहाय्याने फुलांची उधळण करण्यात आली. यावेळी त्यांनी चरणगांव येथे सुरू असलेल्या साखळी उपोषण मंडपाला सुद्धा भेट दिली.



भाषणातील मुद्दे




आणखी काय म्हणाले जरांगे पाटील?




आरक्षण असलेले आणि नसलेले दोन्ही भाऊ भाऊ.


गावखेडे एक होत आहे ही सरकारला धास्ती


धनगर बांधवांची गरज नाही


छोट्या जातीवर अन्याय करत आहे छगन भुजबळ


छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी


आम्ही ओबीसी आरक्षणात येणारच


छगन भुजबळ यांच षडयंत्र मोडून काढा


थोडं महाराष्ट्र बाकी फक्त ओबीसी मध्ये या साठी


35 लाख नोंदी मराठाची नोंद सापडली आहे


हवेत असलेल्या ड्रोन ला पाहून सरकार ला टोमणा

विश्वास ठेवल्याने मराठ्यांचा घात झाला 


सरकार पेक्षा जनतेत मोठी ताकत , एकजूट व्हा


24 डिसेंबरला कायदा पारित होणार


गिरीश महाजन यांना ही टोला


एक महिन्याची वेळ गिरीश महाजांनी मागितलं होत


गिरीश महाजन ला वाटलं मी येडपट आहे की काय


24 ला आरक्षण नाही दिल तर सरकारला जड जाइल


35 नोंदीचा आधार घ्या आणि कायदा पारित करा, बहाणे सांगू नका गिरीश महाजन साहेब


दिलेला शब्द पाळा सरकारला इशारा


आरक्षण असलेल्या मराठयांनी आरक्षण नसलेल्या बांधवांसाठी मदतीला येणाची केली विनंती


आता पर्यंत मराठा नोंदी लपवून ठेवली होती


आरक्षण असलेल्या मराठ्यांना ही दिला इशारा


मराठा आणि ओबीसी मध्ये मोठं प्रेम आहे


छगन भुजबळ यांनी जातीय तेढ निर्माण करण्याच प्रयत्न केला


17 डिसेंबरला पुढची दिशा ठरवू


उग्र आंदोलन न करण्याच आवाहन


आरक्षण मिळेपर्यंत नेते नाही आणि काही पक्ष नाही


सरकारला माझी भाषा नाही समजत


सरकार ने डाव टाकला होता.उपोषण दरम्यान डॉक्टर तपासायला आले आणि त्यांनी सांगितलं मला एकच किडनी आहे.




माझा त्रास मलाच माहीत खूप त्रास होत आहे, मी भीत नाही माझा जीव गेला तरी चालेल.









टिप्पण्या