Islahe-muashara-Ijtema-akola: 26 रोजी अकोल्यात इस्लाहे मुआशरा इज्तेमा; हैदराबाद येथील प्रसिद्ध मोहम्मद अहमद नक्शबंदी साहेब यांची विशेष उपस्थिती





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : उर्स ए मुफ्ती आझम बरार निमित्त  मंगळवार, 26 डिसेंबर रोजी नमाज-ए-असर नंतर रात्री 10:00 वाजेपर्यंत एक दिवसीय अझिमो शान इस्लाहे मुआशरा इज्तेमा चे आयोजन करण्यात आले आहे.  



नायगाव येथील शाळा क्रमांक 7 समोर या इज्तेमाचे आयोजन करण्यात आले आहे.  ज्यामध्ये हैदराबाद येथील प्रसिद्ध शान-ए-दक्कन खतीबे बेमिसाल हजरत मौलाना मोहम्मद अहमद नक्शबंदी साहेब यांची विशेष उपस्थिती राहणार असून ते मुस्लिम समाजाला संबोधित करणार आहेत.   



हजरत मौलाना मोहम्मद अहमद नक्शबंदी साहिब यांचे धार्मिक प्रवचन सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. जे मुस्लिम समाजातील नागरिकांना खूप आवडते.  आता त्यांच्या अकोल्यात आगमन होत असल्या मुऴे मुस्लिम समाजाची मोठ्या प्रमाणात उत्सुकतेने उपस्थिती राहण्याची शक्यता आहे. 



मुफ्ती-ए-आझम अकोला हजरत अल्लामा मौलाना मुफ्ती गुलाम मुस्तफा रिजवानी यांच्या मार्गदर्शनाखाली या इज्तेमाचे आयोजन करण्यात आले आहे.  या इज्तेमामध्ये अकोल्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.  



हा इज्तेमा यशस्वी करण्यासाठी मौलाना मोहम्मद युनूस रझवी, हाफिज व कारी साजिद अहमद नूरी, हाफिज व कारी जावई मुफ्ती आझम बरार इस्माईल शामी साहब, ईद ए मिलाद मिरवणूक समितीचे अध्यक्ष हाजी मुदाम साहेब, हाजी शम्स तबरेज, राजा कॉन्ट्रॅक्टर, सरकार ग्रुप व युवकअहले सुन्नत नायगाव अथक प्रयत्न करत आहे.

टिप्पण्या