- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
अकोला: बोरगांव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या एका आरोपीवर गुन्हे सिद्ध झाल्याने न्यायलयाने त्याला 1 वर्ष कारावासाची शिक्षा ठोठवली आहे.
आज 11 डिसेंबर 2023 रोजी एस. जे. शर्मा, अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायालय, (विशेष न्यायालय) अकोला येथे पोलीस स्टेशन बोरगाव मंजू येथे नोंद असलेल्या गुन्ह्यातील कलम. 354, 354 (अ) 452 भा. द. वी. अनुसार आरोपी संदिप रामेश्वर धांडे वय 33 वर्षे रा. सावरा मंचनपुर, ता. जि. अकोला यास दोषी ठरविले आहे.
असा आहे निकाल
कलम 235 crpc अन्वये आरोपी दोषी
कलम 354 (अ) भा. द. वी. मध्ये 1 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व 5000 रु दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास. कलम 354 भा. द. वी. मध्ये 1 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व 5000 रु दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास.
कलम 452 भा. द. वी. मध्ये 1 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व ५००० रु दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास.
कलम 8 व 12 pocso act मध्ये गुन्हा सिद्ध झाला नाही.
गुन्हेगारास सर्व शिक्षा एकत्रीत भोगाव्या लागतील. अधिकतम शिक्षा 1 वर्षे, व एकूण दंड रू. 15000 असा भरावा लागणार आहे.
हकीकत अशी आहे की 13 डिसेंबर 2021 रोजी पिडीतेने (वय 14 वर्षे) पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली की, आरोपी तिच्या घरी कोणी नसताना आला व तिच्याशी असभ्य वर्तन करून तिचा विनय भंग केला. अश्या फिर्यादीवरून सदर गुन्हा आरोपींवर नोंदवण्यात आला व तपासानंतर न्यायालयात दोशारोप पत्र सादर करण्यात आले.
या प्रकरणात सरकार तर्फे 7 साक्षीदारांचे साक्षी पुरावे नोंदविण्यात आले. साक्ष पुरावा ग्राह्य धरून आरोपीस शिक्षा ठोठावण्यात आली.
आरोपी गवंडी काम करीत असे, आरोपीने पीडितेच्या घराचे बांधकाम केले होते, बांधकामाच्या राहिलेल्या मजुरीची मागणी करायला गेलो होतो तेव्हा त्याला मारहाण करण्यात आली. व खोटा गुन्हा नोंदविण्यात आला असा बचाव आरोपीने घेतला होता. तो कोर्टाने अमान्य केला.
या प्रकरणात सरकार पक्षाची बाजु एपीपी किरण खोत यांनी मांडली. तपास अधिकारी एपीआय विशाल तेली, पैरवी प्रिया गजानन शेंगोकार, सतिश हाडोळे यांनी केली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा