- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
अकोला, दि. २२ : नाताळ सण व नववर्ष स्वागत उत्सव निमित्त मद्य विक्रीची दुकाने २४, २५ व ३१ डिसेंबर रोजी अधिक काळ सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी निर्गमित केला.
आदेशानुसार, विदेशी मद्य किरकोळ विक्रीचे दुकान (एफएल-२) व बंद बाटलीतून बिअर विक्री (एफएल बीआर-२) या तिन्ही दिवशी रात्री १०.३० ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत करण्यास परवानगी आहे.
परवाना कक्ष (एफएल-३) व क्लब (एफएल-४) या तिन्ही दिवशी पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त रात्री ११:३० ते पहाटे पाच वाजेपर्यंत व पोलिस आयुक्तालयाच्या क्षेत्रासाठी रात्री दीड ते दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहू शकतील.
देशी दारू किरकोळ मद्यविक्री (सीएल-३) महापालिका तसेच अ आणि ब वर्ग नगरपालिका क्षेत्रातील दुकानांसाठी रात्री ११ ते दुसऱ्या दिवशी पहाटे एक वाजेपर्यंत व इतर ठिकाणी रात्री ११ ते दुसऱ्या दिवशी पहाटे एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे.
सवलत दिलेल्या वेळेव्यतिरिक्त अधिक काळ मद्यविक्री सुरू ठेवल्यास कठोर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा आदेशात देण्यात आला आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा