- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Ban-on-onion-export: देशातील ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांदा उपलब्ध होणार ;केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर घातली बंदी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दे
कांद्याची आवक सुरळीत ठेवत, ग्राहकांना कांदा मिळावा, यासाठी केंद्र सरकारने 8 डिसेंबर 2023 पासून 31 मार्च 2024 पर्यंत कांद्यावर प्रतिबंध लागू केले.
ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय निर्णय
भारतीय अलंकार न्यूज 24
नवी दिल्ली: देशातील ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांदा उपलब्ध व्हावा, यासाठी, केंद्र सरकारने, कांद्याच्या निर्यातीवर आठ डिसेंबर 2023 ते 31 मार्च 2024 या काळात, कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. खरीपाचे पीक येण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन, तसेच निर्यात होणाऱ्या कांद्याची गुणवत्ता, जागतिक परिस्थिती जसे की तुर्कीये, इजिप्त आणि इराण या देशांनी घातलेले व्यापार आणि बिगर व्यापारी निर्बंध, या सगळ्याचा विचार करत सरकारने हा निर्णय घेतला आहे.
या घडामोडींचा फटका शेतकऱ्यांना बसू नये, यासाठी, केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून मूल्य स्थिरिकरण निधीअंतर्गत सातत्याने कांद्याची खरेदी करत आहे.
चालू आर्थिक वर्षात, सरकारने एनसीसीएफ आणि नाफेड या दोन्ही संस्थांना, सात लाख टन कांदा, राखीव साठा म्हणून खरेदी करण्यास सांगितले आहे. आतापर्यंत सुमारे 5.10 लाख टन धान्याची खरेदी करण्यात आली असून उर्वरित खरेदीचे काम सुरू आहे. खुल्या बाजारपेठेतील विक्री आणि ग्राहकांना थेट किरकोळ विक्रीद्वारे सरकारने खरेदी केलेल्या कांद्याची सतत उच्च किंमतीच्या बाजारपेठेत विकला जात आहे. साठयामधून काढण्यात आलेल्या 2.73 लाख टन कांद्यापैकी सुमारे 20,700 मेट्रिक टन कांद्याची विक्री 2,139 किरकोळ केंद्रांद्वारे 213 शहरांमधील किरकोळ ग्राहकांना करण्यात आली आहे.
सरकारच्या बहुआयामी हस्तक्षेपांमुळे, कांद्याची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत 17 नोव्हेंबर रोजी असलेल्या प्रति किलो 59.9 रुपयांवरून 8 डिसेंबर रोजी प्रति किलो 56.8 रुपयांपर्यंत कमी झाली आहे.
29 ऑक्टोबर रोजी सरकारने कांद्याच्या निर्यातीसाठी आणि त्याच वेळी कांद्याच्या राखीव साठ्याचा उपयोग करण्यासाठी, प्रति टन 800 अमेरिकन डॉलर्स इतके किमान निर्यात मूल्य लागू केले. हे निर्यात मूल्य, कांद्याच्या निर्यातीचे प्रमाण कमी करण्यात प्रभावी ठरले असले तरी, जागतिक परिस्थिती आणि खरीप पिकाला होत असलेल्या विलंबामुळे, मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात सुरू राहिली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा