bag lifting crime: खासगी बस मधून रोख रक्कम पळविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दापाश; एक आरोपी अकोला एलसीबीच्या जाळ्यात, आरोपी कडून ऐकोणअंशी लाख रूपये हस्तगत



ठळक मुद्दा 

बॅग लिफ्टींग गुन्हे करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील एक आरोपी स्थानीक गुन्हे शाखा, अकोलाचे जाळ्यात; आरोपी जवळून ७९,००,०००/-रू हस्तगत





ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: एका खासगी बसमधून प्रवास करणाऱ्या आंगडीया सर्व्हिसच्या कर्मचाऱ्यास चोरट्यांनी चांगलाच हात दाखविला.  त्याच्याकडील ऐंशी लाखाची रोकड हातोहात लंपास केल्याची घटना पातूरात रविवार २६ नोव्हेंबरच्या रात्री घडली होती. स्थानिक गुन्हे शाखा अकोला पोलीसांनी तपास चक्रे वेगाने फिरवून बॅग लिफ्टींग गुन्हे करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा मागोवा घेत, एका आठवड्याच्या आत टोळीतील एक आरोपी स्थानीक गुन्हे शाखा, अकोलाचे जाळ्यात अडकविला. आरोपी जवळून ७९,००,०००/-रू हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.




दिनांक २६/११/२०२३ रोजी फिर्यादी नामे राजु चेलाजी प्रजापती (वय २६ वर्ष रा. आंगडीया सर्व्हिस घर क. १०१ गजानन टॉवर शंकर नगर रोड राजापेठ अमरावती) हे त्यांचे व्यापाराचे पैसे घेवून ट्रॅव्हल्सने अमरावती येथून मुंबई येथे जात असता, पोलीस स्टेशन पातुर हद्दीतील क्वालीटी धाब्यावर बस थांबल्यानंतर फिर्यादी हे गाडीचे बाहेर आले असता तेवढ्यातच आरोपी ट्रॅव्हल्स बस मध्ये प्रवेश करून फिर्यादीची पैश्यांने भरलेले बॅग चोरून फरार झाले होते. यावरून पोलीस स्टेशन पातुर येथे अपराध नं ५३२/२३ कलम ३७९ भा.दं.वि नोंद असून तपासावर आहे. सदर चोरीची उकल करण्यासाठी पोलीस अधीक्षक अकोला यांनी स्थागुशा अकोला यांना आदेशीत केले होते. पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स्थागुशा यांनी त्यांचे अधिनस्त एक पथक तयार करून सदर गुन्हा उघडकीस आणणेकरीता रवाना करण्यात आले. पो.नि शंकर शेळके स्थागुशा. अकोला यांच्या आदेशावरून तसेच मार्गदर्शनाखाली सपोनि. कैलास डी. भगत, पोउपनि गोपाल जाधव व पो. अमंलदार यांनी सदर गुन्हयाचा छडा लावण्यासाठी गोपनिय बातमीदार तसेच तांत्रिक बाबीच्या आधारे सदर गुन्हा करण्याऱ्या आरोपी निष्पन्न केले. स्थागुशा अकोला येथील पथक हे मध्यप्रदेश येथे रवाना होवून त्यांनी ग्राम खेवा ता मनवार जि.धार येथील आरोपी  विनोद विश्राम चव्हाण (वय १९ वर्ष रा. लुन्हेरा बुजूर्ग ता. मनावर जि.धार) याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेवून गुन्हया सबंधाने विचापूस केली असता, त्याचे राहते घरातुन रोख रक्कम ७९,००,०००/-रू (ऐकोणअंशी लाख रूपये) दोन पंचा समक्ष जप्त करण्यात आले. त्यावरून त्यास त्याचे साथीदार  रहेमान उर्फे पवली गफुर खान याला पोलीसांची चाहुल लागल्याने तो फरार झाला. त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही.




ही कारवाई पोलीस अधीक्षक अकोला संदीप घुगे , अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, पो.नि  शंकर शेळके स्थागुशा अकोला यांचे मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखा अकोलाचे सपोनि.  कैलास डी. भगत, पोउपनि. गोपाल जाधव, पो. अंमलदार. गणेश पांडे, राजपालसिंग ठाकुर, रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, अब्दुल माजीद, विशाल मोरे, एजाज अहेमद, वसीमोद्दीन शेख, अविनाश पाचपोर, भिमराव दिपके, स्वप्नील चौधरी, राहुल गायकवाड, अन्सार शेख, मोहम्मंद आमीर, लिलाधर खंडारे, खुशाल नेमाडे, चालक अक्षय बोबडे, प्रविण कश्यप, प्रशांत कमलाकर, अनिल राठोड यांनी केली आहे.



टिप्पण्या