Akola-ZP-by-election-chohtta: अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणूक: वंचितने गड राखला; योगेश वडाळ विजयी





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अकोला जिल्हा परिषदचे माजी सभापती वंचित बहुजन आघाडीचे पंजाबराव वडाळ यांचे निधन झाल्यामुळे चोहट्टा बाजार येथील जिल्हा परिषदेची जागा रिक्त होती. या रिक्त जागेवर पार पडलेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने आपली जागा कायम ठेवली आहे. 



रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार योगेश वडाळ यांनी 3781 मते घेत प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार गजानन नळे यांचा 1400 मतांच्या अंतराने पराभव करून दणदणीत विजय संपादन केला. तिसऱ्या स्थानावर प्रहार जनशक्ती पक्षचे जीवन खवले यांना 1765 मते मिळाली.


भाजप , काँग्रेस , शिवसेना उद्धव ठाकरे आणि प्रहार पक्षाने ही जागा जिंकण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती. काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या ठिकाणी आले होते. तर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी सुद्धा येथे शर्थीचे प्रयत्न केले होते. 



रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार योगेश वडाळ यांनी ३७८१ मते घेत प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार गजानन नाळे यांचा १४०० मतांच्या अंतराने पराभव करून दणदणीत विजय संपादन केला. 







जिल्हा परिषदमध्ये एकूण 53 जागा आहे तर सत्ता स्थापनासाठी 25 सदस्यांची गरज आहे. यामध्ये वंचित कडे 24 तर आघाडीकडे 23 जागा आहेत. भाजप 5 उमेदवारांसोबत तटस्थ भूमिकेत आहे.  मात्र आजची ही जागा जिंकल्याने वंचितने आपली जिल्हा परिषदची सत्ता कायम ठेवली आहे.

टिप्पण्या