Akola crime: गस्त घालणाऱ्या पोलिसांवर गोळीबार; मांजरी फाटा ते कंचनपुर रोडवर घडली घटना

 file images 



भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: उरळ पोलीस स्टेशनचे पोलीस ३० डिसेंबरच्या रात्री परिसरात  पट्रोलींग ड्युटी करीत असतांना अडीच ते तीन वाजताच्या दरम्यान ग्राम मांजरी फाटा ते कंचनपुर रोड येथे पोलिसांवर अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याची घटना घडली.



सविस्तर वृत्त असे की, दिनांक ३१/१२/२०२३ रोजी (३० डिसेंबरच्या रात्री) पोलीस शिपाई दिनकर इंगळे हे त्यांची पो स्टे चे शासकीय वाहन सेकंड मोबाईल क्रमांक एम एच ३० एच ५४९, चालक पोलीस शिपाई नितेश मुंढे यांचे सह पो स्टे परिसरात नाईट पट्रोलींग ड्युटी करीत होते. रात्री ०२/४० ते ०२/५० वाजताच्या दरम्यान ग्राम मांजरी फाटा ते कंचनपुर रोड येथे त्यांना दोन मोटार सायकल वर चार इसम संशयास्पद स्थितीत आढळून आले. पोलिसांनी शासकिय वाहनासह  मोटार सायकलचा पाठलाग केला. याच दरम्यान एक मोटार सायकल वरील पाठीमागे बसलेल्या इसमाने त्याचे पाठीवरील लांब शस्त्र काढून पाठीमागे न पाहता लांब शस्त्रामधुन फायर केल्याचा पोलीसांना आवाज आला. तरीसुद्धा पोलिसांनी शासकिय वाहनाने त्यांचा पाठलाग केला. मात्र ते इसम मोटार सायकल घेवुन पळून गेले. त्यांनतर पोलिसांनी गाडी थांबवुन शासकीय वाहनाची पाहणी केली असता, गाडीच्या समोरील काचाला छररे लागल्याने ०८ छिद्रे पडलेले दिसुन आले. 



या घटनेनंतर पोलीस शिपाई दिनकर इंगळे यांनी पो. स्टे. ला दिलेल्या लेखी रिपोर्ट वरून दोन मोटार सायकल चार अज्ञात इसमांविरूद्ध पो. स्टे. ला अप नं ४३२/२३ क ३५३,३३६, ३४ भादंवि सह क. ३,२५ आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. 



या गुन्ह्याचा तपास स.पो.नि. गोपाल ढोले करीत आहे. या गुन्ह्यातील सर्व आरोपींचा शोध सुरू आहे.

टिप्पण्या