Akola crime: ऑनलाईन मैत्री करुन विवाहितेवर अतिप्रसंग; आरोपीवर गुन्हे दाखल






भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : फेसबुकवर ऑनलाईन मैत्री करून एका विवाहित महिलेवर अतिप्रसंग केल्याची घटना अकोला जिल्ह्यातील अकोट येथे घडली आहे. फेसबुकवर मैत्री करणारा हा व्यक्ती अकोला पोलीस दलात कार्यरत आहे. 



पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी पोलीस कर्मचाऱ्याने आधी महिलेसोबत फेसबुक नावाच्या समाज माध्यम ॲप्लिकेशनवर ऑनलाईन मैत्री केली. नंतर दोघांची प्रत्यक्ष भेट घडली. त्यानंतर वारंवार भेटी घडू लागल्या. दरम्यान आरोपीने पीडिते सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दीर्घ काळा नंतर आरोपी पिडीतेस ब्लॅकमेल करायला लागला, असे पीडित महिलेने तक्रारीत म्हंटलं आहे.



अकोट पोलिसांनी आरोपी पोलीस कर्मचारी विरुद्ध 19 डिसेंबर रोजी भारतीय दंड विधान कलम 354, 354 (अ) 354 (3) 376(1) (ए) 376(2) (न) 376(3) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. मात्र आरोपीस याचा सुगावा लागताच तो फरार झाल्याचे कळते. आरोपीचा शोध अकोट शहर पोलीस घेत आहेत.

टिप्पण्या