Akola crime: गोवंश जनावरे चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश: 11 आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखा अकोलाची यशस्वी कामगिरी




ठळक मुददे 

अकोला जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यातील १६ गुन्हे उघडकीस. गुन्हयात वापरेलेली इनोव्हा, टाटा व्हिस्टा, मोटारसायकल सह एकुण २०,९९,५०० रू. चा मुददेमाल जप्त.


 

एक इनोव्हा चारचाकी वाहन


तीन टाटा इंडिका विस्टा चारचाकी वाहने


तीन मोटार सायकली


एकुण सहा मोबाईल


एकुण ११ आरोपी अटकेत


रोख ३,००,०००/- रू.


असा एकुण २०,९९,५००/- रू.चा मुददेमाल जप्त.






भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जिल्हयातील गोवंश जनावरे चोरी करून त्यांची कत्तल व विक्री करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा अकोला कडुन पर्दाफाश करण्यात आला असून ११ आरोपींना गजाआड केले आहे. 



जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यातील १६ गुन्हे उघडकीस आले असून, आरोपींनी गुन्हयात वापरेलेली इनोव्हा, टाटा व्हिस्टा, मोटारसायकल सह एकुण २०,९९,५०० रू. चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.



सन २०२३ मध्ये अकोला जिल्हात मोठया प्रमाणात गोवंश जनावरे चोरीची मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत. ही बाब पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी गांभीर्याने घेवून हे गुन्हे उघडकीस आणणे बाबत पथकाला सूचना केल्या. यानंतर स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख  शंकर शेळके यांनी गोवंश जनावर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पथक गठीत केले. या पथकाने गोपनीय बातमीदाराकडुन तसेच तांत्रीक तपासावरून आरोपी शेख शकील शेख जलील वय ४२ वर्षे रा. खैर मोहम्मद प्लॉट, अकोला,  शेख राजीक शेख रज्जाक वय ३५ वर्षे रा. इंदीरा नगर, वाडेगाव, ता. बाळापुर, जि. अकोला, मो. असलम मो. अशरफ वय ३६ वर्षे रा. इंदीरा नगर, वाडेगाव, ता. बाळापुर, जि. अकोला,  जाहीद अली राजीक अली,  नसीर उद्दीन अलीम उद्दीन,  गुलाम शाहीद गुलाम राजीक, शेख शारीफ उद्दीन शेख अलीम उद्दीन,  कुदरत खान अहेशान खान, शेख ईरफान शेख उस्मान, वसीम अहेमद जहुर अहेमद राहणार अकोला, अन्सार अहेमद मुक्तार अहेमद, रा कांगरपुरा अकोट यांना ताब्यात घेवून  विचारपुस केली.   




अकोला जिल्हा येथील पो.स्टे. बार्शिटाकळी, पातुर, बाळापुर, उरळ, सिटी कोतवाली, अकोट फाईल, दहिहांडा, अकोट शहर, हिवरखेड, तेल्हारा वेगवेगळया पोलीस स्टेशनचे एकुण गोवंश चोरीचे १६ गुन्हे उघडकीस आणुन गुन्हा करताना गुन्हयात वापरलेले चारचाकी वाहने, मोटार सायकली, आरोपींचे मोबाईल एकुण ६ नग व नगदी ३,००,०००/- रू. असा एकुण २०,९९,५०० /- रू.चा मुददेमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे.




जप्त करण्यात आलेला मुद्देमाल



१) पो.स्टे. पातुर अप क. ३६३/२३ गुन्हयात एक इनोव्हा चारचाकी गाडी किं. अं. ८ लाख, एक बजाज पल्सर मो.सा. किं. अं. १ लाख, दोन मोबाईल ११,५००/- रू. नगदी ५००० रू. जप्त करण्यात आले.


२) पो.स्टे. पातुर अप. कं. २२५/२३ गुन्हयात १७,००० रू. जप्त करण्यात आले.


३) पो.स्टे. बाळापुर अप.क १८३/२३ गुन्हयात ३३,००० रू. जप्त.


४) पो.स्टे. बाळापुर अप.कं. ७१०/२३ गुन्हयात ३०,००० रु. जप्त.


५) पो. स्टे बाळापुर अप. कं. ७१२/२३ गुन्हयात ३३,००० रु. जप्त.


६ ) पो.स्टे. बार्शिटाकळी अप. कं. ९०/२३ गुन्हयात ८,००० रू. जप्त.


७) पो.स्टे. उरळ अप.कं. ३७८/२३ गुन्हयात ३२,००० रू. जप्त करण्यात आले.


८) पो.स्टे. सिटी कोतवाली अप.क. २३६/२०२३ कलम ३७९ भा. द. वि. मध्ये फिर्यादी उमेश रविंद्र लांडगे रा. अनिकट अकोला यांचे गोवंश जनावरे चोरण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पण झाले आहे.


यातील आरोपी हे पो.स्टे. पातुर येथील अप.नं. ३६३/२३ कलम ३७९ भा.दं. वि मध्ये पुढील तपासकामी ताब्यात देण्यात आले.


पो.स्टे. अकोट फाईल अकोला.


अपराध नं ४९५/२३ कलम ३७९ भा.दं. वि. गुन्हयात एकुण ३,३५,०००/- रू. चा मुददेमाल जप्त करण्यात आले.


पो.स्टे. अकोट फाईल, अकोला.


अपराध नं ५०२/२३ कलम ३७९ भा.दं. वि. एकुण ३५,०००/- रु. चा मुददेमाल जप्त करण्यात आले.


पो.स्टे. हिवरखेड अकोला.


अपराध नं २८०/२३ कलम ३८०,३४ भा.दं. वि. १२,०००/- रू. चा मुददेमाल जप्त करण्यात आले.


पो.स्टे. दहिहंडा


अपराध नं १४४/२३ कलम ३७९ भा.दं. वि. ५४,०००/- रू. चा मुददेमाल जप्त करण्यात आले. पो.स्टे. दहिहंडा.


अपराध नं ३५८/२३ कलम ३७९ भा.दं. वि. ५,०००/-रु. चा मुददेमाल जप्त करण्यात आले. पो.स्टे. तेल्हारा, अकोला.


अपराध नं ३७२/२३ कलम ३७९ भा.दं.वि. ६,०००/-रु. चा मुददेमाल जप्त करण्यात आले.

पो.स्टे. उरळ,


अपराध नं १०/२३ कलम ३९२,५०६,३४ भा.दं.वि. एक टाटा इंडिका विस्टा, गुन्हयात ५,३०,००० रू. जप्त करण्यात आले.


पो.स्टे. तेल्हारा, अकोला.


अपराध नं १५३/२३ कलम ५११ भा.दं.वि.चे असे सर्व गुन्हे आरोपींनी कबुल केले आहेत.


यांनी केली कारवाई 



ही कार्यवाही पोलीस अधिक्षक  संदिप घुगे,  अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक शंकर शेळके, सहायक पोलीस निरिक्षक कैलास भगत, पोलीस उपनिरिक्षक गोपाल जाधव, पोलीस अंमलदार दशरथ बोरकर, गोकुळ चव्हाण, रविंद्र खंडारे, भास्कर धोत्रे, उमेश पराये, अविनाश पाचपोर, महेंद्र मलिये, प्रमोद डोईफोडे, विशाल मोरे, लिलाधर खंडारे, भिमराव दिपके, सुलतान पठाण, खुशाल नेमाडे, अन्सार अहमद, ऐजाज अहमद, आकाश मानकर, फिरोज खान, स्वप्निल चौधरी, स्वप्निल खेडकर, धिरज वानखडे, अब्दुल माजिद, चालक पोलीस शिपाई प्रशांत कमलाकर, मो. नफिस यांनी केली आहे.


फिर्यादी यांना आवाहन 

उघडकीस आलेल्या गुन्ह्यातील फिर्यादी यांनी संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क करून गुन्ह्यातील रक्कम मिळवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी, असे आवाहन अकोला पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.



टिप्पण्या