- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
agitation-yarn-mill-workers- akot: अकोट येथील सूतगिरणी कामगारांनी पुकारले आंदोलन; शोले स्टाईल पाण्याच्या टाकीवर चढून वेधले लक्ष
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : अकोट येथील अकोट तालुका सहकारी सूतगिरणीच्या कामगारांनी शोले स्टाईल आंदोलन पुकारलं असून किशोर भगत, मुकुंद खनके, राजकुमार मेंढे, शिवदास खराटे हे चार युवक आज मंगळवारी पाण्याच्या टाकीवर चढले आहेत. कामाच्या मोबदल्याची थकीत रक्कम मिळावी,यासाठी या कामगारांनी आपला जीव धोक्यात घातला आहे. शासन प्रशासनाने कामगार आणि सूतगिरणीचे मालक संचालक यांच्यातील हा तिढा लवकर सोडवून कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
अकोट तालुका सहकारी सूतगिरणी ही संस्था सन 2007 साली महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेने आपल्या ताब्यात घेतली होती. त्यानंतर 2010 साली ही संस्था अवसायनात काढण्यात आली होती. यानंतर संस्था बंद पडल्याने येथील कामगार बेरोजगार झाले आहेत. थकीत वेतन आणि इतर लाभ मिळवण्यासाठी या कामगारांनी न्यायालयात दाद मागितली होती.
उच्च न्यायालयाने सूतगिरणीकडून कामगारांना प्रॉव्हिडंट फंड 53 लक्ष ६६ हजार 298 रुपये तर कामगार वेतन 14 कोटी 85 लक्ष रुपये असे एकूण 15 कोटी 38 लक्ष 66 हजार 298 रुपये घेणे असल्याचा निर्वाळा दिला होता. बँकेने या सुतगिरणीचा लिलाव केला होता. यामध्ये अमरावती येथील एका व्यवसायिकाने कर्मचाऱ्यांचे थकीत अदा करून, ही सूतगिरणी घेण्यास सहमती दिली होती. मात्र, सुतगिरणी ताब्यात घेतल्यानंतर अद्यापही या कर्मचाऱ्यांना थकीत दिल्या गेले नाही.
कामगारांनी अनेकदा पाठपुरवठा केल्यानंतरही कामगार कर्मचाऱ्यांना घामाचे पैसे न मिळाल्याने आज शेवटी अकोट तहसील कार्यालया जवळील पाण्याच्या टाकीवर चढून या कामगारांनी शोले स्टाईल आंदोलन पुकारले आहे.
“थकित रक्कम जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत टाकीवरून खाली न उतरण्याचा निर्धार आम्ही कामगारांनी घेतला आहे.”
-शिवदास खराटे,
आंदोलनकर्ते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा