67th National School Boxing: 67 व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचा समारोप:सर्वसाधारण विजेतेपद महाराष्ट्र संघाकडे; हिमांशू, जतीन, रेहान ठरले बेस्ट बॉक्सर




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: 67 राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धाचा समारोप आज शुक्रवारी वसंत देसाई क्रीडांगण येथे झाला. या स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद सर्वाधिक गुण प्राप्त करीत महाराष्ट्र संघाने पटकाविले. हरियाणा राज्य संघ उपविजेता ठरला. तर सीबीएसई संघाला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.



 

१४ वर्षा आतिल वयोगटात खेळाडू गोपाल गणेशे, (महाराष्ट्र) संस्कार  आश्रम (महाराष्ट्र), आदित्य मेहरा (उत्तराखंड), अक्षत (हरियाणा), हर्षल (सीबीएसई), सुजल कुमार (दिल्ली), के रुदमकश (मणिपुर), नभकल भंडारी (उत्तराखंड), आयु मलिक (हरियाणा), विशाल थापा (उत्तराखंड), शुभम (हरियाणा), यांनी विजय मिळविला. 







17 वर्ष वयोगटात अंकित गुजरात, शिवम सीआयएससी, निखिल केवीएस, साहिल सीबीएसई, जतिन हरियाणा, धीरज एस. हरियाणा, आर्यन विद्या भारती, योगेश डिएव्ही, अनिरुद्ध रावत दिल्ली, कर्मवीर सिंह राजस्थान, लोकेश हरियाणा, यश कुमार सीबीएसई ,सैफ अली महाराष्ट्र यांनी सुवर्ण पदक पटकाविले.





19 वर्षा आतील गटात स्वर्ण तन्मय कलंत्रे महाराष्ट्र ,अथर्व बिरकड महाराष्ट्र, यासर मुलानी महाराष्ट्र, रेहान शाह महाराष्ट्र ,शुभम हरियाणा ,रौनक हरियाणा ,चौधरी सीबीएसई ,कृषिपाल चंडीगढ़ ,सुमित उत्तर प्रदेश ,हर्ष राठी उत्तर प्रदेश यांनी सुवर्ण पदक प्राप्त केले. 



महाराष्ट्र संघाने या स्पर्धेत एकूण आठ सुवर्ण पदक तर हरियाणा संघाने सात सुवर्णपदक पटकविले. सीबीएससी संघाने चार सुवर्णपदक प्राप्त केले. 



बेस्ट बॉक्सर पुरस्कार


स्पर्धेत 14 वर्षातील गटात सीबीएससीचा हिमांशू, 17 वर्ष आतील गटात हरियाणाचा जतीन आणि 19 वर्षे वयोगटात महाराष्ट्राचा रेहान शहा हा बेस्ट बॉक्सर ठरला. तसेच ऋषीकांत वचकल महाराष्ट्र यांना बेस्ट रेफरी तर हरियाणाचे मनोज सिंग यांना बेस्ट जज पुरस्कार देण्यात आला. हिमांशू शुक्ला (लखनऊ ) यांनी स्पर्धा निरीक्षक म्हणून काम पाहिले.


बक्षिस वितरण 


पालकमंत्री राधाकृष्ण पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन करताना अकोल्यामध्ये लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॉक्सिंग एरिना तयार करण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाला आमदार वसंत खंडेलवाल, आमदार हरीश पिंपळे, आमदार अमोल मिटकरी, आमदार प्रकाश भारसाकळे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन निलेश गाडगे (अकोला) व विकास काटे (पुणे) यांनी केले.



टिप्पण्या