suicide -case- status -sad-life: 'सॅड लाईफ' चे स्टेटस ठेवत बारावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या:कुटुंबीयांकडून परस्पर अंत्यसंस्काराची तयारी;ऐनवेळी पोहोचले पोलीस





भारतीय अलंकार न्यूज 24

आलेगाव: पातुर तालुक्यातील आलेगाव येथे एका बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गुरुवारी दुपारी आत्महत्या केली. व्हाट्सअप स्टेटस वर सॅड लाईफ असे स्टेटस ठेवून आत्महत्या केल्यानंतर कुटुंबीयांनी परस्पर अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली होती. परंतु ऐनवेळी पोलीस पोहोचल्याने पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला.

       



याबाबत प्राप्त सविस्तर माहिती अशी की आलेगाव येथील एक विद्यार्थिनी बारावी वर्गात शिकत होती. गुरुवारी 23 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्या मोबाईलच्या व्हाट्सअप स्टेटस वर 'सॅड लाईफ' असे लिहिले होते. कुटुंबीयांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती न देता परस्पर मृतदेह खाली उतरवला आणि अंतिम संस्काराची तयारी केली. परंतु या गोष्टीची माहिती गावात पसरल्यानंतर गावातून कोणीतरी पोलिसांना माहिती दिली. 




माहिती मिळताच पोलीस ताबडतोब गावात पोहोचले. चान्नी पोलिसांनी गावात येऊन अंतिम संस्काराच्या तयारीत असलेल्या मृतदेहाला ताब्यात घेतले. हा मृतदेह आधी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये देण्यात आला. तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर तो अकोल्याला पाठविला. 



मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती न देण्यामागचे कारण काय आणि सदर मुलीने आत्महत्या का केली? याचा तपास लागणे अद्याप बाकी आहे. त्याबाबत चान्नी पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास चान्नी पोलीस करीत आहेत.

टिप्पण्या