political-maharashtra-ncp : आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य सरकार जाती-जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करत आहे - अनिल देशमुख यांचा आरोप







भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला :आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य सरकार जाती-जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करत असाल्याचा घणाघात अनिल देशमुखांनी केला. अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटील यांच्या आंदोलन दरम्यान अमानुष लाठीचार्ज करण्यात आला होता,असा अमानुष लाठी हल्ला गृहामंत्र्यांच्या आदेशाशिवाय कोणताही पोलीस अधीक्षक करू शकत नसल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला.



खासदार शरद पवार यांच्या नागपूर येथिल सभेकरिता आढावा घेण्यासाठी आणि कार्यक्रमाच्या नियोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (शरद पवार गट) तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख अकोला येथे मंगळवारी आले असतांना माध्यमांशी ते बोलत होते.




अजित पवार यांचा वापर फक्त लोकसभे पर्यंत करण्यात येणार आणि त्यानंतर त्यांना साईड लाईन करण्यात येईल. मात्र, आतापासूनच त्यांना साईड लाईन करण्यात येत आहे, अशी टीका देखील अनिल देशमुख यांनी केली. 






महाराष्ट्रात अनेक प्रश्न असतांना मुख्यमंत्री भाजपच्या प्रचारासाठी तेलंगणात जात आहेत, याची तीव्र नाराजी जनतेमध्ये असल्याचंही ते म्हणाले. तर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे, बेरोजगारीकडे, महागाईकडे लक्ष द्यावं, अशी विनंतीही अनिल देशमुखांनी केली.




तर आपल्या मतदार संघातून स्वतः उभे राहणार की सुपुत्र याच खुलासा वेळ आल्यावर करू असे ही ते म्हणाले.



तत्पूर्वी अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँगेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मातोश्री सभागृहात ही बैठक पार पडली.



टिप्पण्या