govardhan sharma : गोवर्धन शर्मा हे खऱ्या अर्थाने जनसामान्यांचे नेते- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



भारतीय अलंकार 24

अकोला: आमदार स्वर्गीय गोवर्धन शर्मा हे लोकांमध्ये सहज मिसळून त्यांचे सुखदु:ख जाणून घेणारे, अडचणीला तत्काळ धावून जाणारे, तसेच राजकारणात विरळा व नि:स्पृह व्यक्तिमत्व होते. ते खऱ्या अर्थाने जनसामान्यांचे नेते होते, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वर्गीय गोवर्धन शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली. 


                                                                                                                                                              उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज अकोला येथील आमदार स्वर्गीय गोवर्धन शर्मा यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले व त्यांना श्रद्धांजली वाहिली. श्री. फडणवीस यांनी स्वर्गीय शर्मा यांचे कुटुंबिय श्रीमती गंगादेवी शर्मा, कृष्णा शर्मा, अनुप शर्मा यांच्याशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.





उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, स्वर्गीय गोवर्धन शर्मा यांनी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द अनुभवली. आपण स्वत: त्यांच्यासोबत 25 वर्षे विधानसभेत काम केले. ते संघर्षशील व जिंदादिल नेतृत्व होते. लोकांमध्ये सहज मिसळून जाण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. त्यांनी जनसामान्यांत मिसळून त्यांच्या अडचणी सोडविल्या. त्यांना सत्तेचा लोभ नव्हता. मिळालेले मंत्रीपद त्यांनी सोडून दिले.  लालाजीं शिवाय अकोल्याची कल्पनाही करता येत नाही.  




   

यावेळी स्वर्गीय शर्मा यांच्या पार्थिवाला पोलीस पथकाकडून मानवंदना देण्यात आली. आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरिश पिंपळे, आकाश फुंडकर,  राजेंद्र पाटणी, वसंत खंडेलवाल, आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधिक्षक संदीप घुगे व अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.




टिप्पण्या