Akola crime: अकोट फाईल परिसरात तणाव पूर्ण शांतता; पोलिसांचा तगडा बंदोबस्त, पालकमंत्री विखे पाटिल यांनी घेतली घटनेची दखल





कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये

पोलीस प्रशासनाचे आवाहन 






भारतीय अलंकार 24

अकोला:  शहरातील संवेदन शील भाग म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या अकोट फाईल भागातील भीम नगर चौक तसेच कुरेशी चौक परिसरात आपसी वादातून तेढ निर्माण झाला आहे.



  

मिळालेल्या माहितीनुसार आज सोमवारी रात्री साडेआठ नऊ वाजताच्या सुमारास एका मद्यपी व्यक्तीने भीम नगर परिसरात शिवीगाळ केल्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला होता. आपसी वादातून  दगडफेक करण्यात आली होती. दगडफेकीची माहिती मिळताच अकोट फाइल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. 



घटनेची माहिती वरिष्ठांना देताच घटनास्थळी ॲडिशनल एस. पी. अभय डोंगरे. एस‌. ‌डी. पी. ओ. सुभाष दुधगावकर. यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास अकोट फाईल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू हे करीत आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून हा आपसी वाद असून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अकोट फाईल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू यांनी केले आहे.



पालकमंत्री यांनी घटनेची घेतली दखल


अकोला: अकोट फाईल मधील घटनेची दखल जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांच्या मार्फत त्यांनी आज अकोट फाईल येथे दोन गटांमध्ये झालेली दगडफेक व त्यानंतरची परिस्थिती पूर्ण माहिती घेऊन पोलीस प्रशासनाला शांतता ठेवून दोषींवर कारवाई करण्याची आदेश दिले आहे.



अकोला शहराची व जिल्ह्याची शांतता रहावी याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी तसेच जिल्ह्यातील सर्व सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी अकोला शहराची संस्कृती व जिल्ह्याची संस्कृती कायम ठेवण्यासाठी पुढाकार घेऊन अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पालकमंत्री नामदार  राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. 



आमदार  रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, विजय अग्रवाल किशोर पाटील जयंत मसने यांच्याशी पालकमंत्र्यांनी संवाद साधला तसेच जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाची संपर्कात नामदार विखे पाटील आहे. 





अकोला शहरात अल्पवयीन मुली सोबत झालेल्या प्रकरणाची सुद्धा माहिती पालकमंत्री नामदार विखे पाटील यांनी घेऊन दोषीवर सक्त कारवाई करण्याची निर्देश दिले आहेत.


टिप्पण्या