Political news: दिलीप वळसे पाटील यांच्या समोरच मिटकरी आणि मोहोड यांच्यातील वाद उफाळला




भारतीय अलंकार 24

अकोला : राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये  राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सहभागी झाल्यानंतर राज्यात राष्ट्रवादीने पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे मेळावे सुरू केले आहे. पक्ष मजबुती साठी नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विदर्भात पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावे पार पडत आहे.





अकोल्यातही बुधवारी पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी पक्ष बांधणीसाठी जोमाने कार्य करण्याचं गुरूमंत्र कार्यकर्त्यांना वळसे पाटलांनी दिला. या मेळाव्यात मात्र शिवा मोहोड यांच्या जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी नियुक्ती वर आमदार अमोल मिटकरी यांनी थेट दिलीप वळसे पाटील यांच्या समोरच आक्षेप घेत आपली नाराजी व्यक्त केली. शिवा मोहोडची आपण तक्रार अजित पवारांकडे केली असून, या नियुक्तीवर  आक्षेप पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी जाहीर केली. मिटकरी आणि मोहोड यांच्या या वादामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद पक्षाच्या आणि जनतेच्या समोर आला. या  वादामुळे मेळाव्यात काही काळ स्मशान शांतता पसरली होती.

टिप्पण्या