- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
अकोला: शिवसेनेचे आमदार नितिन देशमुख राजकीय भविष्य अंधकारमय असल्यामुळे त्यांना धनाजी संताजी सारखे सातत्याने केंद्रीय मंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. जिल्हा परिषद सदस्य अपात्र प्रकरणाशी फडणविस यांचा संबंध नसताना केवळ जाती-धर्मामध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी व बेताल वक्तव्य करुन स्वस्तात प्रसिद्धी मिळविण्यासाठी ठाकरे सेनेचे आमदार नितीन देशमुख भाजपा आणि भाजपा नेत्यांवर सातत्याने आरोप करत आहे. यापुढे असा प्रकार सहन केल्या जाणार नाही, अशी चेतावणी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे, भाजपा ओबीसी आघाडीचे उपाध्यक्ष बळीराम सिरस्कार ,भाजपा पश्चिम विधानसभा प्रमुख विजय अग्रवाल यांनी दिला.
अकोला शहरात सोमवारी आमदार नितिन देशमुख यांनी एक पत्रकार परिषदेत आमंत्रित केली होती. या पत्रकार परिषदेनंतर जिल्हा परिषद सदस्यच्या अपात्रतेच्या मुद्यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि भाजप मध्ये परत एकदा शितयुद्ध सुरू झाले. आमदार नितिन देशमुख यांनी या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत बोलताना त्यांच्यासाठी ' फडतूस ' हा शब्द उच्चारला. यामुळे आता हे राजकीय शितयुद्ध पेट घेणार की काय अश्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या.
दरम्यान भाजपाने नितिन देशमुख यांच्या पत्रकार परिषदेनंतर एक प्रसिध्दी पत्रक काढून याद्वारा आमदार देशमुख यांना चेतावणी दिली आहे.
जिल्हा परिषद किंवा कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस ढवळाढवळ करत नाही. कोणतेही राजकीय द्वेष मधून काम करत नाही. सगळ्यांना सोबत घेऊन, सगळ्यांचा सन्मान करून, सातत्याने विकासाचा संकल्प घेऊन, महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा सर्वांगीण विकास व्हावा, या दृष्टीने प्रयत्नशील लोकनेते देवेंद्र फडणवीस आहेत. भाजपाच्या बळावर निवडून आलेले नितीन देशमुख अकोल्याच्या संस्कृतीचा अपमान करून अकोल्याच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य सातत्याने करत आहे. यापुढे हा प्रकार सहन केल्या जाणार नाही. खालच्या स्तरावर जात जिल्ह्यातील कोणत्याही पक्षाचा नेत्याने गेल्या पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य केलेले नाही. परंतु बेताल वक्तव्य करून स्वस्त पब्लिसिटी मिळवण्यासाठी सातत्याने आमदार देशमुख अशा प्रकारचा आरोप करत असतात. परंतु जिल्ह्यामध्ये जाती-जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये फूट पाडून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील, तर ते अकोल्याची जनता त्यांना माफ करणार नाही. अशा प्रकारचे वक्तव्य करून अकोल्याच्या सुसंस्कृतीचा अपमान त्यांनी करू नये. विरोधकांनी टीका करणे लोकशाहीमध्ये मान्य असून, तो त्यांचा अधिकार आहे. धोरणात्मक विषयावर टीका करावी. परंतु व्यक्तीगत टीका करणे, हा प्रकार निंदनीय आहे . अशा वक्तव्याचा अकोला भाजपा किंवा निषेध व्यक्त करत आहे.
आमदार देशमुख यांनी शब्द उपयोग जपून करावा, अन्यथा त्यांना त्याच भाषेमध्ये उत्तर देण्यात येईल. भाजपाचे कार्यकर्ते उत्तर देण्यास समर्थ आहे. त्यामुळे त्यांनी आपली मर्यादा ओळखून भाजपा नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका टिपणी करावी.
जिल्ह्याचे पालकमंत्री व नामदार देवेंद्र फडणवीस कोणताही राजकीय विरोधकाचा अपमान किंवा कोणतेही कामात हस्तक्षेप करत नाही, हा इतिहास त्यांनी पाहून घ्यावा. देवेंद्र फडणवीस हे विकासाचा सोबत सर्वांचा सन्मान गौरव करणारे नेतृत्व आहे. त्यांच्याविषयी यापुढे कोणतेही असभ्य वक्तव्य सहन केल्या जाणार नाही. आमदार देशमुख यांनी ताबडतोब या विषयावर आपले शब्द मागे घ्यावे, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागेल, असा सूचक इशारा जयंत मसने,किशोर मागटे यांनी दिला आहे.
Akola
BJP
Devendra Fadnavis
Nitin Deshmukh
political cold war
Political news
randhir sawarkar
Shiv Sena
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा