orthopedic-camp- akola-city: 90 टक्के बड्या हॉस्पिटल मध्ये रुग्णांची लुबाडणूक - डॉ श्रीकृष्ण ढोणे यांचे वक्तव्य



माजी  आमदार सर्जन स्व. डॉ. जगनाथ ढोणे यांची पुण्यतिथी  व स्व. डॉ. वंदना जगन्नाथ ढोणे यांचे स्मृतीप्रत्यर्थ अस्थीरोग निदान शिबिर व योगासन स्यर्धाचे आयोजन 



भारतीय अलंकार 24

अकोला: अलीकडे मुंबई शहरासह देशातले मोठमोठे डॉक्टर आहेत ते अक्षरशः रुग्णाकडे सावज म्हणून पाहतात. सध्याच्या दगदगीच्या जीवनात आणि रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे लोकांची हाडे खिळखिळी होतात. त्यामुळे बऱ्याच जणांना ऑर्थोपेडिक सर्जनकडे जावे लागते. पण एकदा असा त्रस्त रुग्ण डॉक्टरकडे गेला की, थेट सावज आला, अशा दृष्टीने त्याच्याकडे पाहिले जाते. एकामागोमाग एक अशा अनेक वैद्यकीय महागड्या चाचण्या सुचविल्या जातात. त्यामध्ये डॉक्टरांचे कमिशन असते. मग ऑपरेशन करावेच लागेल, असे सांगून या रुग्णाला थेट ऑपरेशन बेडवर घेतले जाते. दुखण्यामुळे बेजार झालेला रुग्ण निमूटपणे ऑपरेशन करून घेतो. हा प्रकार जवळजवळ ९० टक्के बड्या हॉस्पिटलात सुरू आहे. अशी धक्कादायक माहिती ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. श्रीकृष्ण ढोणे यांनी गुरुवारी अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.



मोफत अस्थीरोग निदान शिबिर व योगासन स्पर्धाचे आयोजन निम्मित आयोजित पत्रकार परिषदेत डॉ.ढोणे यांनी वैद्यकीय क्षेत्रात गरजू रुग्णांची होणारी फसवणूक, आर्थिक पिळवणूक याबाबत माहिती  दिली.



स्व. डॉ. वंदनाताई जगन्नाथ ढोणे, ग्रामीण आयुर्वेदिक महाविद्यालय, पातूर येथे  सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत  26 व 27 ऑक्टोंबर रोजी आयोजीत करण्यात आले. यामध्ये कम्बर, मान, गुडघा दुखणे व संधीवात आदीं रोगांची  तपासणी हाडांची मोफत करण्यात आली.


सध्या मोठमोठ्या हॉस्पिटल मध्ये रोग निदानासाठी गरज नसतांना विविध चाचण्या घेतल्या जातात. त्या चाचण्यांची रोग निदान करण्यासाठी  कोणतीही गरज नसते. मात्र रुग्णांची आर्थिक लूट करण्यासाठी हे सगळे प्रयत्न केले जात आहेत,असे डॉ. ढोणे म्हणाले.


सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांनी नियमित चालणे, सायकल चालविणे, शारीरिक कसरत, योगासन केले पाहिजे. दररोज आहारात पालेभाज्या, कडधान्य याचा वापर केल्यास कोणत्याही प्रकारचे हाडाचे दुखणे, विकार, समस्या होणार नाही, असा सल्ला डॉ. ढोणे यांनी यावेळी दिला.



 

 

टिप्पण्या