maratha reservation: मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ अकोला जिल्ह्यात आमदार खासदारांच्या घरासमोर होणार आत्मक्लेश आंदोलन





भारतीय अलंकार 24

अकोला : मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या गरजवंत मराठा आरक्षण आंदोलनामध्ये अकोला जिल्ह्य मराठा समाजाची भूमिका व कृती कार्यक्रम ठरविण्यासाठी आज महत्वाची बैठक पार पडली. या सभेत महत्वाच्या तीन विषयांवर एकमताने निर्णय घेण्यात आले. 



यामध्ये जरांगे पाटील यांना राज्य सरकारने सुरक्षा प्रदान करावी आणि जरांगे पाटील यांच्या केसाला धक्काही लागल्यास उग्र आंदोलनाला सुरुवात करण्यात येईल.





जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदार खासदार यांच्या घरा समोर शांततेत ,

आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे. 



याशिवाय गावागावात जाऊन मराठा आरक्षणा बाबत जन जागृती निर्माण करून गावात फलक लावून नेत्यांना गाव बंदी करण्यात येणार आहे, अश्या प्रकारचे निर्णय बैठकीत घेण्यात आले.



या सभेत सकल मराठा आक्रोश मोर्चा चे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.




टिप्पण्या