maharaja-agrasen-jayanti-akl: शनिवारपासून अकोल्यात होणार अग्रवाल समाजाच्या महाराजा अग्रसेन जयंती सप्ताहाचा प्रारंभ

अग्रवाल समितीचे अध्यक्ष डॉ. जुगल चिराणीया माहिती देताना 



ठळक मुद्दा 

जयंती सोहळ्यात अग्र विभूती व अग्र आयकॉन पुरस्काराचे होणार वितरण 




भारतीय अलंकार 24

अकोला: सकल अग्रवाल समाजाचे आराध्य महाराजा अग्रसेन यांची पावन जयंती रविवार 15 ऑक्टोबर रोजी सकल अग्रवाल समाज मोठ्या हर्षोल्लासात साजरी करीत आहे. या अनुषंगाने सालाबाद प्रमाणे या वर्षीही अग्रवाल समितीच्या वतीने महाराजा अग्रसेन जयंतीचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या जयंती सप्ताहात अनेक कार्यक्रमांची रेलचेल राहणार असल्याची माहिती अग्रवाल समितीचे अध्यक्ष डॉ. जुगल चिराणीया यांनी दिली. 




अग्रसेन भावनात बुधवारी संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत या जयंती उत्सवाची माहिती देण्यात आली. 



अग्रसेन जयंतीच्या सप्ताहातील कार्यक्रमांचा प्रारंभ शनिवार  7 ऑक्टोबर पासून सकाळी 9 वाजता अग्रसेन भवनात यजमान समाजसेवी ज्ञानचंद गर्ग यांच्या उपस्थितीत गणेश पूजनाने होणार आहे. यानंतर द 4 वाजता अग्रवाल महिला मंडळ व नवयुवक मंडळाच्या वतीने गायक राम देशपांडे यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे. 



रविवार  8 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 वाजता अग्रवाल नवयुवक मंडळाच्या वतीने ट्रायसिकल, लेमन, चॉकलेट शोधा, संगीत खुर्ची, बलून फोटा आदी स्पर्धा होऊन दुपारी चित्रकला स्पर्धा तथा अग्रवाल स्पोर्ट स्पर्धा होणार आहे. दुपारी 4 वाजता अग्रवाल समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा होणार आहे. 



सोमवार 9 ऑक्टोबर रोजी अग्रवाल महिला मंडळाच्या वतीने दुपारी 3 वाजता अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून, त्यामध्ये मेहंदी, पिठाने दिवे बनवणे, रुसलेल्या पतीला मनविणे, दुपारी भजनावर नृत्य स्पर्धा तथा हौजी हंगामा व लकी ड्रॉ स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. 



मंगळवार 10 ऑक्टोबर रोजी नवयुवक मंडळाच्या वतीने  2 वाजता दिवा सजवा स्पर्धा होऊन  3 वाजता महिला मंडळाच्या वतीने मिसेस अग्रवाल हा रंगारंग कार्यक्रम होणार आहे. 



बुधवार 11 ऑक्टोबर रोजी अग्रवाल समितीच्या वतीने सकाळी दहा वाजता भव्य त्वचारोग निदान शिविर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये डॉ राजेश केडिया, डॉ श्रद्धा सलामपूरीया, डॉ शिवानी तातिया, डॉ वृंदा केडिया है रुग्ण तपासणी करणार आहेत. याच दिवशी सायंकाळी 6 वाजता जवाहर नगर येथील नव्या अग्रसेन भवनात नवयुवक मंडळाच्या वतीने भव्य आनंद मेला होणार आहे. यामध्ये अनेक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. 



गुरुवार 12 ऑक्टोंबर रोजी दुपारी 3 वाजता महिला मंडळाच्या वतीने पाककला स्पर्धा होऊन त्यानंतर आंब्याच्या पानाचे तोरण बनवणे, अखंड दिव्यांची बात बनवणे, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, हौजी हंगामा होणार आहे. 




शुक्रवार 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता अग्रवाल नवयुवक मंडळाच्या वतीने महिला व युवतींसाठी बिस्किट व चॉकलेट बनविणे, ररांगोळी स्पर्धा होवून दुपारी बच्चे कंपनीसाठी भव्य नृत्य स्पर्धा होणार आहे. 



जयंतीच्या पूर्व संध्येवर शनिवार 14 ऑक्टोंबर रोजी जवाहर नगर येथील महाराजा अग्रसेन भवनात अग्रवाल महिला मंडळाच्या वतीने भव्य नृत्य नाटिका भक्ती सागर सादर करण्यात येणार आहे. 



मुख्य जयंतीचा सोहळा हा रविवार 15 ऑक्टोंबर रोजी असून या दिनी सायंकाळी 6.30 वाजता स्थानिक अग्रसेन भवनात जयंती समारोह होणार असून, या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष कैलास जोगानी तथा लीलावती व बॉम्बे हॉस्पिटल येथे कार्यरत असणारे डॉ रितेश अग्रवाल उपस्थित राहणार आहेत. 



या सोहळ्यात समाजाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा अग्रविभूती हा मानाचा पुरस्कार यंदा समाजाचे जेष्ठ समाजसेवी व दानशूर म्हणून ओळख असणारे स्व. कालूराम रामकिसन रुहादटिया यांना दिल्या जाणार असून, या सोबतच अकोला अग्र आयकॉन हा पुरस्कार समाजाचे वरिष्ठ समाजसेवी गणपतराय खेतान, ओमप्रकाश केडिया, ॲड. सुरेशचंद्र अग्रवाल गुरुजी, अशोक अग्रवाल, शैलेंद्र कागलीवाल यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. 



जयंती दिनावर दुपारी 3.30 वाजता स्थानीय राणी सती धाम येथून समाजाची भव्य शोभायात्रा निघणार आहे. अनेक देखाव्या समवेत ही शोभायात्रा गांधी चौक, सिटी कोतवाली, तिलक रोड, जुने कापड बाजार, मनपा चौक मार्गाने अग्रसेन भवन येथे येऊन या शोभायात्रेचे जयंत समारोहात रूपांतर होणार आहे. 



या जयंती सप्ताहातील सर्व कार्यक्रमांना समाजाच्या महिला पुरुष युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात आपली उपस्थिती द्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी अग्रवाल समितीचे सचिव ॲड. सुरेश अग्रवाल, अग्रवाल महिला मंडळाच्या अध्यक्ष संतोष केडिया, सचिव अनिता मुरारका, नवयुवक मंडळाचे अध्यक्ष यश अग्रवाल, सचिव अक्षय सुरेका उपस्थित होते. 



टिप्पण्या